पहिल्यांदा क्रेडिट कार्ड वापरत असाल तर कार्डवरील छुपे खर्च माहीत करून घ्या! नाहीतर कपाळाला हात मारण्याची येईल वेळ

सध्या क्रेडिट कार्डचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला असून आजकालच्या तरुणाईमध्ये क्रेडिट कार्ड वापराचे प्रमाण जास्त प्रमाणात दिसून येते. आपल्याला माहित आहे की, कुठल्याही स्वरूपाची खरेदी करताना आणि बऱ्याच गोष्टींसाठी क्रेडिट कार्डचा वापर केला जातो.

Ratnakar Ashok Patil
Published:
credit card

Hidden Charges On Credit Card:- सध्या क्रेडिट कार्डचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला असून आजकालच्या तरुणाईमध्ये क्रेडिट कार्ड वापराचे प्रमाण जास्त प्रमाणात दिसून येते. आपल्याला माहित आहे की, कुठल्याही स्वरूपाची खरेदी करताना आणि बऱ्याच गोष्टींसाठी क्रेडिट कार्डचा वापर केला जातो.

परंतु अशा पद्धतीने क्रेडिट कार्डचा वापर करताना मात्र बरेचजण खर्च करताना मागचा पुढचा विचार करत नाही आणि हवा तितका खर्च करत सुटतात. क्रेडिट कार्ड जितके फायद्याचे आहे तितके त्याचे नुकसान देखील आहे. जर क्रेडिट कार्डचा वापर चुकीच्या पद्धतीने केला गेला तर भविष्यात हेच फायद्याचे क्रेडिट कार्ड तुम्हाला कर्जाच्या दरीत ढकलू शकते हे मात्र निश्चित.

त्यामुळे तुम्ही पहिल्यांदाच क्रेडिट कार्डसाठी अर्ज करत असाल किंवा क्रेडिट कार्ड वापरायला सुरुवात केली असेल तर क्रेडिट कार्डचा वापरावर कोणते अतिरिक्त खर्च कोणत्या स्वरूपात लागतात?हे तुम्हाला माहीत असणे खूप गरजेचे आहे. त्याचीच माहिती आपण या लेखात घेऊ.

क्रेडिट कार्डवर लागतो या पद्धतीचा अतिरिक्त खर्च

1- व्याज- क्रेडिट कार्ड वापरणे हे एक प्रकारचे कर्ज घेण्यासारखेच आहे व तुम्ही जे काही क्रेडिट कार्डवरून खर्च करतात त्याचे बिल वेळेवर भरणे खूप गरजेचे असते.

परंतु तुम्ही जर क्रेडिट कार्डचे बिल वेळेवर भरले नाही तर थकीत रकमेवर व्याज आकरतात व हा व्याजदर खूप प्रचंड प्रमाणात असतो. त्यामुळे तुम्ही जर बिल वेळेवर भरले नाही तर तुम्हाला अव्वाच्या सव्वा पैसे भरावे लागू शकतात.

2- क्रेडिट कार्डसाठीची वार्षिक फी- जेव्हा कुठलीही बँक क्रेडिट कार्ड जारी करत असते तेव्हा वार्षिक शुल्क आकारत असते व विशेष म्हणजे वेगवेगळ्या बँकांचे शुल्क वेगवेगळे असते.

तसेच काही बँका मात्र वार्षिक शुल्क आकारत नाहीत. अनेक वैशिष्ट्यपूर्ण ऑफर करणाऱ्या प्रीमियम क्रेडिट कार्डमध्ये नियमित क्रेडिट कार्डपेक्षा जास्त प्रमाणामध्ये वार्षिक शुल्क आकारले जाते व याचे देखील भान ठेवणे गरजेचे आहे.

3- क्रेडिट कार्डचा वापर करून रोख पैसे काढण्याचे शुल्क- क्रेडिट कार्डमधून रोख स्वरूपाचे पैसे काढले तरी देखील बँक त्यावर शुल्क आकारतात. अशा प्रकारचे शुल्क एकूण रकमेच्या अडीच टक्क्यांपर्यंत देखील आकारले जाऊ शकते. त्यामुळे क्रेडिट कार्डचा वापर करून रोख रक्कम न काढणे हेच हिताचे ठरते.

4- उशिरा पेमेंट अर्थात लेट पेमेंट फी- बऱ्याचदा आपण क्रेडिट कार्डचा वापर करतो. परंतु पेमेंट करण्यासाठी जर आपण उशीर केला तर मात्र या उशिरा पेमेंटसाठी देखील बँकांच्या माध्यमातून शुल्क आकारले जाते. त्यामुळे उशिरा पेमेंट करू नये व वेळच्यावेळी पेमेंट करावे.

5- वस्तू आणि सेवा कर- जसे आपण पाहिले की, क्रेडिट कार्ड वर वार्षिक शुल्क तसेच ईएमआय प्रक्रिया शुल्क इत्यादी अनेक प्रकारचे शुल्क लागते व सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे क्रेडिट कार्ड व्यवहारांवर 18 टक्क्यांचा जीएसटी देखील लागू आहे. त्यामुळे क्रेडिट कार्ड वापरताना या खर्चाचा देखील विचार करणे गरजेचे आहे.

6- दुसऱ्या देशात क्रेडिट कार्डचा व्यवहार केला तर लागणारे शुल्क- समजा तुम्ही परदेशात गेलात आणि त्या ठिकाणी तर क्रेडिट कार्डवर व्यवहार केला तरी बँकांच्या माध्यमातून वेगळ्या प्रकारचे शुल्क आकारले जाते व हे एकूण खर्च केलेल्या रकमेच्या दीड ते तीन टक्क्यांपर्यंत असू शकते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe