काही लोक पैसे असूनही गृह कर्ज का घेतात ? Home Loan चे ‘हे’ फायदे तुम्हाला माहीतच असायला हवेत

गृह कर्ज घेतले तर लाखो रुपयांचे व्याज भरावे लागते. पण, काही लोक पैसे असूनही मुद्दामून गृह कर्ज घेतात, कारण म्हणजे गृह कर्जाचे काही फायदे देखील आहेत. दरम्यान आज आपण हेच फायदे थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

Tejas B Shelar
Published:
Home Loan Benefits

Home Loan Benefits : घर असावे असे स्वप्न कोणाचे नाही? सर्वच जण हक्काच्या घराचे स्वप्न पाहतात. यासाठी अहोरात्र काबाडकष्ट करतात. मात्र प्रत्येकाला घराचे स्वप्न सहजासहजी पूर्ण करता येत नाही. गृह खरेदीसाठी लागणारा पैसा प्रत्येकाकडेच उपलब्ध नसतो. यामुळे अनेकांचे हे स्वप्न लवकर पूर्ण होत नाही.

तर काहीजण गृह कर्ज घेऊन घराचे स्वप्न पूर्ण करतात. मात्र काही असेही लोक आहेत ज्यांच्याकडे घरासाठी संपूर्ण पैसा असूनही ते गृह कर्ज काढतात. यामुळे काही लोकांना घर घेण्यासाठी पैसे असतांनाही लोक कर्ज का काढतात हा प्रश्न पडतो.

कारण की गृह कर्ज घेतले तर लाखो रुपयांचे व्याज भरावे लागते. पण, काही लोक पैसे असूनही मुद्दामून गृह कर्ज घेतात, कारण म्हणजे गृह कर्जाचे काही फायदे देखील आहेत. दरम्यान आज आपण हेच फायदे थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

होम लोनचे फायदे

1) गृहकर्जाचा सर्वाधिक फायदा हा आयकर भरणाऱ्यांना होतो. गृहकर्जामुळे करदात्यांना कर वाचवता येणे कायद्याने शक्य आहे. आयकर अधिनियमाच्या कलम 24(b) अंतर्गत गृहकर्जाच्या व्याजदरावर प्रत्येक आर्थिक वर्षात 2 लाख रुपयांची सवलत मिळू शकते. तसेच, कलम 80सी अंतर्गत 1.5 लाख रुपयांपर्यंत कर सवलतही मिळते. यामुळे काही लोक मुद्दामून गृह कर्ज घेतात.

2) एकट्याने गृह कर्ज घेतले तर साडेतीन लाख रुपयांच्या कर सवलतीचा फायदा मिळतो. पण जर पती-पत्नी दोघांनीही संयुक्त गृह कर्ज घेतले तर त्यांना तब्बल सात लाख रुपयांपर्यंतचा फायदा मिळतो. पण, यासाठी घर पती आणि पत्नी दोघांच्या नावावर असणे आवश्यक असते.

3) तिसरा मोठा फायदा म्हणजे गृह कर्जाचे व्याजदर इतर कर्जाच्या तुलनेत कमी असतात. विशेष म्हणजे महिलांना काही बँकांकडून व्याज सवलतही दिली जाते. म्हणजेच महिलांना कमी इंटरेस्ट रेट वर होम लोन मिळते.

यामुळे काही लोक गृह कर्ज काढतात आणि त्यांच्याकडील शिल्लक राहिलेला पैसा इतर बचत योजनांमध्ये गुंतवतात. अलीकडे जेवढा गृह कर्जाचा हप्ता असतो तेवढेच पैसे म्युच्युअल फंडमध्ये इन्वेस्ट करण्याचा ट्रेंड आला आहे. याचा फायदा देखील गुंतवणूकदारांना होतोय.

4) काही लोक जुने घर खरेदी करतात, अशावेळी त्या घराची डागडुजी करावी लागते. यासाठीही मोठी रक्कम लागते. सोबतच घराचे इंटेरियर करणे देखील अलीकडे खर्चिक बनले आहे. यामुळे जर होम लोन घेतलेले असेल तर त्यावर टॉप अप लोन घेऊन हा खर्च भागवता येणे शक्य आहे. कारण की टॉप अप होम लोनचे व्याजदर देखील कमी असतात.

5) पाचवा आणि सर्वात महत्त्वाचा आणि मोठा फायदा म्हणजे जी मालमत्ता खरेदी केली आहे ती विवादीत तर नाही ना? त्या मालमत्ते विरोधात न्यायालयात काही वाद तर नाही ना? तिच्यावर इतर कर्ज, काही घोळ तर नाही ना हे समजते. कारण की बँका या सर्व गोष्टींची पडताळणी करून आणि कागदपत्रांची योग्य पद्धतीने पडताळणी करून कर्ज देतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe