तुम्हीही 40 लाख Home Loan घेतलेले आहे का? आता EMI होणार कमी… वाचणार ‘इतके’ पैसे! पण कसे?

जर तुम्ही गृहकर्ज घेतले असेल किंवा घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने अलीकडेच रेपो दरात कपात केली आहे. ज्याचा थेट परिणाम गृहकर्जाच्या EMI वर होणार आहे.

Published on -

Home Loan Calculation:- जर तुम्ही गृहकर्ज घेतले असेल किंवा घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने अलीकडेच रेपो दरात कपात केली आहे. ज्याचा थेट परिणाम गृहकर्जाच्या EMI वर होणार आहे.

यामुळे कर्जदारांना मोठा दिलासा मिळणार असून त्यांचा मासिक हप्ता कमी होण्याची शक्यता आहे. रेपो दर म्हणजे बँकांना आरबीआयकडून मिळणाऱ्या कर्जाचा व्याजदर. जेव्हा आरबीआय हा दर कमी करते तेव्हा बँकाही त्यांच्या कर्जांचे व्याजदर कमी करतात. त्यामुळे गृहकर्जाचे हप्ते स्वस्त होतात.

रेपो दरात घट

आरबीआयने 25 बेसिस पॉइंट्सने (०.२५%) रेपो दर कमी करून तो 6.25% केला आहे. बँकांनीही जर आपल्या गृहकर्जाच्या व्याजदरात याच प्रमाणात कपात केली तर कर्जदारांना मोठा फायदा होईल. उदाहरणार्थ जर तुम्ही 40 लाख रुपयांचे होमलोन घेतले असेल आणि ते 20 वर्षांसाठी असेल तर या बदलाचा तुमच्या EMI आणि एकूण व्याजावर कसा परिणाम होईल ते पाहूया.

पूर्वी 9% व्याजदर असताना तुम्हाला दरमहा 35989 हप्ता भरावा लागत होता. मात्र नवीन व्याजदर 8.75% झाल्यास हा EMI 35348 पर्यंत खाली येईल. याचा अर्थ तुम्ही दरमहा 641 रुपये वाचवू शकता. 20 वर्षांच्या कालावधीत तुमच्या एकूण बचतीचा आकडा 1.54 लाख एवढा असेल. ही बचत मोठ्या आर्थिक नियोजनासाठी उपयोगी पडू शकते.

कर्जाचा कालावधी कमी करावा का EMI?

रेपो दर कमी झाल्यामुळे बँका कर्जदारांना दोन पर्याय देतात – एकतर EMI कमी करणे किंवा कर्जाचा कालावधी कमी करणे. जर तुम्ही EMI कमी करण्याऐवजी कर्जाचा कालावधी कमी करण्याचा निर्णय घेतला तर एकूण व्याजात मोठी बचत करता येईल.

उदाहरणार्थ, जर तुम्ही EMI पूर्वीसारखाच 35989 ठेवला तर तुमच्या कर्जाचा कालावधी 240 महिन्यांवरून 229 महिन्यांवर कमी होईल. म्हणजेच तुम्ही 11 महिने आधी कर्जमुक्त होऊ शकता.

यामुळे तुम्हाला 3.95 लाख रुपयांची अतिरिक्त बचत होईल.जी EMI कपात करण्याच्या पर्यायाच्या तुलनेत दुप्पट बचत आहे. त्यामुळे जर तुमची आर्थिक परिस्थिती परवानगी देत असेल तर EMI न बदलता कर्जाचा कालावधी कमी करणे अधिक फायदेशीर ठरू शकते.

बँकांचे व्याजदर कसे कमी होतात?

आरबीआयने रेपो दर कपात केल्यावरही बँकांचे व्याजदर त्वरित कमी होत नाहीत. 2019 पासून सर्व फ्लोटिंग रेट गृहकर्ज बाह्य बेंचमार्क दरासोबत जोडले गेले आहेत. त्यामुळे रेपो दरात झालेल्या कपातीचा थेट परिणाम गृहकर्ज व्याजदरावर होतो. मात्र प्रत्येक बँक ही कपात कधी लागू करेल हे त्यांच्या अंतर्गत धोरणांवर अवलंबून असते.

रेपो दर कपातीचा कर्ज घेणाऱ्यांना होणारा फायदा

रेपो दर म्हणजे बँकांना आरबीआयकडून मिळणाऱ्या कर्जाचा दर. जेव्हा हा दर कमी होतो. तेव्हा बँकांसाठीही भांडवल स्वस्त होते व त्यामुळे त्या ग्राहकांना स्वस्त कर्ज देऊ शकतात. यामुळे नवीन कर्ज घेणाऱ्यांसाठीही चांगली संधी आहे. कारण त्यांना आधीच्या तुलनेत कमी व्याजदराने कर्ज मिळू शकते.

काय करावे?

जर तुम्ही नवीन होमलोन घेण्याचा विचार करत असाल तर ही योग्य वेळ असू शकते. कारण बँकांचे व्याजदर लवकरच कमी होण्याची शक्यता आहे.जर तुम्ही आधीच गृहकर्ज घेतले असेल तर बँकेकडून व्याजदर कपातीची माहिती घ्या आणि तुम्हाला EMI कमी करायचा आहे की कर्जाचा कालावधी हे ठरवा.जर तुमच्या बँकेने व्याजदरात कपात केली नाही. तर इतर बँकांच्या ऑफर तपासा आणि गृहकर्ज ट्रान्सफरचा पर्यायही विचारात घ्या.

ग्राहकांना होईल मोठा फायदा

आरबीआयच्या या निर्णयामुळे गृहकर्जधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे. EMI मध्ये कपात झाल्याने दरमहा बचत होईल आणि कर्जाचा कालावधी कमी केल्यास लाखो रुपयांची बचत होऊ शकते. त्यामुळे नवीन आणि विद्यमान गृहकर्जधारकांनी त्यांच्या आर्थिक नियोजनानुसार योग्य पर्याय निवडणे महत्त्वाचे आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe