Home Loan EMI : गृहकर्ज घेण्याचा विचार करताय ? 60 लाखांच्या कर्जावर किती EMI भरावा लागेल ? जाणून घ्या संपूर्ण माहिती

Sushant Kulkarni
Published:

Home Loan EMI Calculator : घर खरेदी करणे हा अनेकांच्या आयुष्यातील सर्वात मोठा निर्णय असतो. हल्लीच्या काळात प्रॉपर्टीच्या वाढत्या किमतींमुळे स्वतःचे घर घेणे सामान्य माणसासाठी मोठे आर्थिक आव्हान ठरत आहे. अनेक लोकांना आयुष्यभराची कमाई खर्च करूनही हवे तसे घर घेता येत नाही. अशा परिस्थितीत गृहकर्ज हा एक महत्त्वाचा पर्याय बनतो. मात्र, गृहकर्ज घेताना त्यावर किती व्याज लागेल, मासिक EMI किती येईल आणि एकूण परतफेडीचा खर्च किती होईल, हे जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे.

भारतात बहुतांश मध्यमवर्गीय नागरिक बँकेकडून कर्ज घेऊनच घर खरेदी करतात. मात्र, या कर्जाच्या परतफेडीसाठी त्यांना मूळ रकमेपेक्षा कितीतरी अधिक पैसे भरावे लागतात. त्यामुळे गृहकर्ज घेताना त्याच्या अटी, कालावधी आणि व्याजदर याचा सखोल विचार करणे गरजेचे आहे. आज आपण बँक ऑफ बडोदाच्या गृहकर्ज योजनेवर आधारित 60 लाख रुपयांच्या कर्जावर किती EMI भरावा लागेल याची आज आपण माहिती घेऊयात.

60 लाखांच्या गृहकर्जावर किती EMI लागणार ?

बँक ऑफ बडोदा सध्या गृहकर्जासाठी 8.40% वार्षिक व्याजदर आकारत आहे. मात्र, हा व्याजदर तुमच्या सिबिल स्कोअर, बँकेच्या अटी आणि तुमच्या आर्थिक स्थैर्यानुसार बदलू शकतो.जर तुम्ही 60 लाखांचे घर खरेदी करत असाल, तर बँक तुमच्याकडून 10% डाउन पेमेंट घेते. म्हणजेच, तुम्हाला 6 लाख रुपये डाउन पेमेंट भरावे लागेल आणि बँक तुम्हाला उर्वरित 54 लाख रुपयांचे गृहकर्ज देईल. आता पाहूया, 54 लाखांच्या गृहकर्जावर 30 वर्षांच्या मुदतीसाठी मासिक EMI किती येईल.

मासिक EMI आणि एकूण परतफेडीचा खर्च

जर तुम्ही 30 वर्षांसाठी (360 महिने) गृहकर्ज घेतले, तर तुमचा मासिक EMI ₹41,139 असेल. याचा अर्थ, प्रत्येक महिन्याला तुम्हाला ₹41,139 भरावे लागतील.
संपूर्ण गृहकर्ज परतफेडीचा तपशील: मूळ कर्ज रक्कम: ₹54,00,000, एकूण परतफेड होणारी रक्कम: ₹1,48,10,124, व्याज स्वरूपात द्यावी लागणारी रक्कम: ₹94,10,124 मासिक EMI: ₹41,139, परतफेडीचा कालावधी: 30 वर्षे याचा अर्थ, 30 वर्षांच्या कालावधीत तुम्ही घेतलेल्या मूळ कर्जाच्या दुपटीपेक्षा अधिक रक्कम बँकेला परत कराल.

गृहकर्ज घेताना कोणते महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवावे?

गृहकर्ज घेताना फक्त EMI लक्षात ठेवणे पुरेसे नाही. कर्जाचे योग्य नियोजन न केल्यास, तुम्ही मोठ्या आर्थिक संकटात सापडू शकता. कर्ज घेताना खालील मुद्द्यांवर विचार करणे आवश्यक आहे.

1. कमी कालावधीचे कर्ज घ्या

कर्जाचा कालावधी जितका लहान असेल, तितके कमी व्याज भरावे लागेल. 30 वर्षांच्या ऐवजी 20 किंवा 15 वर्षांसाठी कर्ज घेतल्यास, EMI वाढेल पण एकूण परतफेड होणाऱ्या व्याजाची रक्कम कमी होईल.

2. अतिरिक्त पैसे मिळाल्यास लोन प्री-पेमेंट करा

कधीही बोनस, कमिशन किंवा अतिरिक्त पैसे मिळाल्यास, ते गृहकर्जाच्या प्री-पेमेंटसाठी वापरा. अतिरिक्त पैसे लोनमध्ये भरल्यास, तुम्ही लवकर कर्जमुक्त होऊ शकता आणि व्याजाचा मोठा भार कमी करू शकता.

3. अनावश्यक खर्च टाळा आणि बचत वाढवा

EMI वेळेवर भरण्यासाठी मासिक खर्चाचे योग्य नियोजन करा. बजेट तयार करा आणि अनावश्यक खर्च टाळा.

4. उत्पन्न वाढवा

जर तुम्हाला EMI भरताना अडचण येत असेल, तर अतिरिक्त उत्पन्नाचे मार्ग शोधा. यासाठी फ्रीलान्सिंग, पार्ट-टाईम जॉब किंवा गुंतवणुकीद्वारे उत्पन्न वाढवू शकता.

5. कमी व्याजदरासाठी लोन रिफायनान्स करा

जर तुम्हाला कमी व्याजदराने दुसरी बँक कर्ज देत असेल, तर लोन ट्रान्सफर (Refinance) करून कमी व्याजदरावर नवीन कर्ज घेण्याचा पर्याय निवडू शकता.

गृहकर्ज घेताना कोणत्या गोष्टी टाळाव्यात?

अतिरिक्त कर्ज घेणे: जर तुम्ही आधीच गृहकर्ज घेतले असेल, तर व्यक्तिगत कर्ज किंवा क्रेडिट कार्ड बिलांचे ओझे वाढवू नका.
कर्ज फेडण्यास विलंब करणे: वेळेवर EMI न भरल्यास, तुमचा सिबिल स्कोअर खराब होतो आणि भविष्यात कर्ज घेण्यास अडचण येऊ शकते.
बँकेच्या अटी काळजीपूर्वक न वाचणे: कर्ज घेताना सर्व नियम आणि अटी समजून घ्या. अतिरिक्त शुल्क आणि दंड याबाबत पूर्ण माहिती घ्या.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe