होम लोन घेणाऱ्यांसाठी कामाची बातमी ! ‘या’ 5 बँका देतात सर्वात कमी व्याजदरात Home Loan

Home Loan : नवीन घर घेणार आहात, नव्या घरासाठी होम लोन घेणार आहात, कोणती बँक स्वस्तात गृह कर्ज देते याचा विचार करताय, मग आजची बातमी तुमच्या कामाची राहणार आहे.

खरंतर, अलीकडे घरांच्या किमती प्रचंड वाढल्या आहेत आणि म्हणून अनेकजण स्वतःच्या हक्काच्या घरासाठी गृह कर्जाचा पर्याय स्वीकारतात. दरम्यान, जर तुम्हालाही तुमच्या स्वप्नातील घरासाठी पैशांची आवश्यकता असेल आणि यासाठी होम लोन घेणार असाल तर आजचा हा लेख तुमच्या कामाचा राहणार आहे.

कारण की, आज आपण देशातील अशा पाच बँकांची माहिती पाहणार आहोत ज्या की आपल्या ग्राहकांना कमी व्याजदरात होम लोन पुरवतात. खरे तर गेल्या काही महिन्याच्या काळात रिझर्व बँक ऑफ इंडियाने रेपो रेटमध्ये मोठ्या प्रमाणात कपात केली आणि रेपो रेट कपातीचा परिणाम म्हणून देशभरातील बँकांकडून आता होम लोनच्या व्याजदरात सुद्धा कपात करण्यात येत आहे.

यामध्ये बँक ऑफ महाराष्ट्र बँक ऑफ इंडिया अशा काही बँका सर्वात कमी व्याजदरात आपल्या ग्राहकांना होम लोन उपलब्ध करून देत आहेत. दरम्यान आज आपण टॉप पाच बँकांबाबत माहिती पाहणार आहोत ज्या की ग्राहकांना कमी व्याजदरात कर्ज देतात.

कमी व्याजदरात घर बांधण्यासाठी कर्ज देणाऱ्या बँका

बँक ऑफ महाराष्ट्र : आरबीआय कडून रेपो रेटमध्ये कपात करण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर बँक ऑफ महाराष्ट्र ने सुद्धा होम लोनचे व्याजदर बदलले आहेत. आता ही बँक ग्राहकांना 7.10% व्याजदरात होम लोन देते. मात्र हा बँकेचा सुरुवातीचा व्याजदर आहे आणि याचा लाभ ज्याचा सिबिल स्कोर चांगला असतो त्यांनाच मिळतो.

बँक ऑफ इंडिया : ही बँक सुद्धा 7.10% व्याजदरात आपल्या ग्राहकांना होम लोन उपलब्ध करून देते. मात्र हा बँकेचा सुरुवातीचा व्याजदर आहे याचा फायदा सर्वच ग्राहकांना मिळत नाही. सिबिल स्कोर चांगला असणाऱ्या ग्राहकांना या व्याजदरात कर्ज मंजूर होते.

युनियन बँक ऑफ इंडिया : ही सरकारी बँक आपल्या ग्राहकांना किमान 7.15% व्याजदरात गृह कर्ज उपलब्ध करून देत आहे. मात्र ग्राहकाच्या प्रोफाईल नुसार हा व्याजदर 7.90% पर्यंत सुद्धा जाऊ शकतो. म्हणजे ही बँक कमीत कमी 7.15% आणि जास्तीत जास्त 7.90% व्याजदरात कर्ज उपलब्ध करून देत आहे. मोठ्या रकमेच्या कर्जासाठी देखील हाच व्याजदर कायम राहतो.

स्टेट बँक ऑफ इंडिया : स्टेट बँक ऑफ इंडिया आपल्या ग्राहकांना किमान 7.25 टक्के व्याजदरात होम लोन उपलब्ध करून देते. ही बँक 7.25% ते 8.70% या व्याजदरात आपल्या ग्राहकांना होम लोन देते. मोठ्या कर्जासाठी देखील बँकेचा हाच व्याजदर कायम राहतो.

एलआयसी हाऊसिंग फायनान्स : बँकांसोबतच ही हाऊसिंग फायनान्स कंपनी सुद्धा ग्राहकांना कमी व्याजदरात कर्ज मंजूर करत आहे. घर बांधायचा असल्यास तुमच्यासाठी एलआयसीचा पर्याय बेस्ट राहणार आहे कारण की एलआयसी हाऊसिंग फायनान्स ग्राहकांना 7.15% या सुरुवातीच्या व्याजदरात होम लोन देते. तीस लाख रुपये किंवा त्यावरील कर्जासाठी बँकेचा हा व्याजदर कायम राहतो.