Home Loan News : दसरा दिवाळीला नव्याने घर खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची आणि अगदीच आनंदाची बातमी समोर येत आहे. खरे तर अलीकडे घरांच्या किमती प्रचंड वाढले आहेत आणि म्हणूनच सर्वसामान्य लोक घर खरेदीसाठी कर्ज काढतात.
दरम्यान जर तुम्हाला ही नवं घर खरेदी करण्यासाठी कर्ज काढायचं असेल तर तुमच्यासाठी एक गुड न्यूज समोर आली आहे. देशातील दोन बड्या बँकांनी होम लोनच्या व्याजदरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.

पंजाब नॅशनल बँक आणि बँक ऑफ इंडिया या दोन सरकारी बँकांनी गृहकर्दासहित सर्वच प्रकारचे कर्ज स्वस्त केले आहे. यामुळे सर्वसामान्यांना स्वस्तात घर खरेदी करता येणे शक्य होईल.
पीएनबी आणि बीओआयने कर्जावरील व्याज कमी करण्याचा एक मोठा निर्णय घेतला आहे. दसरा आणि दिवाळीला अनेक लोक नवीन वास्तू खरेदी करतात. तुम्हीही येत्या काळात नवीन घर खरेदी करणार असाल तर नक्कीच या बँकांचा हा निर्णय तुमच्यासाठी दिलासा ठरणार आहे.
ह्या दोन्ही बँकांनी महिन्याच्या सुरूवातीलाच सर्वसामान्यांसाठी एमसीएलआर कमी केले आहे. मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड बेस्ड लँडिंग रेट्स (एमसीएलआर) च्या सीमान्त खर्चाची घट झाल्यामुळे गृह कर्ज, कार आणि वैयक्तिक कर्जावरील व्याज दर कमी होणार आहे.
महत्त्वाची बाब अशी की नवीन रेट 1 सप्टेंबर 2025 पासून लागू झाले आहेत. यामुळे ज्या ग्राहकांची कर्ज एमसीएलआरशी जोडलेली आहेत अशा ग्राहकांना यामुळे थोडासा दिलासा मिळेल. कर्जदारांचा ईएमआय आता कमी होणार आहे.
गेल्या महिन्यात आरबीआयचे चलनविषयक धोरण जाहीर झाले. त्यात रेपो रेटमध्ये कोणताच बदल झाला नाही. हा रेट 5.5% असा स्थिर ठेवण्यात आला आहे. दरम्यान आता बँकांनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आणि स्पर्धा राखण्यासाठी त्यांचे एमसीएलआर कमी केले आहेत.
कोणत्या ग्राहकांना फायदा मिळणार?
एमसीएलआर रेट गृह कर्ज, वाहन कर्ज आणि वैयक्तिक कर्ज यासारख्या फ्लोटिंग रेट कर्जाच्या ईएमआयवर परिणाम करतात. दरात घट झाल्यामुळे विद्यमान ग्राहकांची ईएमआय कमी होणार आहे. पण आता नवीन फ्लोटिंग रेट लोन आता ईबीएलआरशी जोडलेले असतात.
बँका ग्राहकांना एमसीएलआरकडून ईबीएलआरकडे जाण्याची ऑफर देतात. थोडक्यात या निर्णयामुळे विविध प्रकारचे कर्ज घेतलेल्या ग्राहकांना आराम मिळणार आहे. विशेषत: ज्यांची कर्ज अद्याप एमसीएलआरशी संबंधित आहेत त्यांना यांचा लाभ मिळणार आहे.