Home Loan Recover Tips: गृह कर्जासाठी घेतलेली रक्कम ‘या’ ट्रिक्सने करा वसूल! घरही होईल आणि पैसाही वाचेल

Published on -

Home Loan Recover Tips:- प्रत्येकाला घराचे स्वप्न पूर्ण करायचे असते व हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पैसा लागतो. कारण पैशांशिवाय स्वतःचे घर होणे जवळजवळ अशक्य आहे  त्यामुळे प्रत्येकाला आपल्या हक्काचं घर मिळवण्यासाठी गृह कर्जाचा आधार घ्यावा लागतो. कारण घरांना लागणारी एवढी मोठी किंमत ॲडजस्ट करणे होम लोनशिवाय शक्य होत नाही. आपण गृह कर्ज तर घेतो व आपल्या स्वतःच्या घराचे स्वप्न देखील पूर्ण करतो.

परंतु घेतलेल्या होमलोनचा कालावधी व व्याजाचा दर पाहिला तर आपल्याला अनेक वर्षांपर्यंत त्या होमलोनची परतफेड करणे गरजेचे असते व यामध्ये फार मोठी रक्कम आपली निव्वळ व्याजापोटी बँकेला भरत असतो. बऱ्याचदा आपल्याला दिसून येते की अशा प्रकारच्या होमलोनमध्ये जो काही ईएमआय असतो यामध्ये मुद्दल थोड्या रकमेने कमी होत असते परंतु व्याज जास्त जात असते.

तसेच व्याजदर वाढल्यामुळे कर्जाचा हप्ता आणखीनच वाढतो किंवा त्याचा कालावधी तरी वाढतो. बऱ्याचदा तुम्ही वीस वर्षांकरिता तीस लाख रुपयांचं कर्ज घेतात तेव्हा तुम्हाला प्रिन्सिपल अमाऊंट जेवढे आहे तेवढे व्याज देखील द्याव लागतं. म्हणजे एका अर्थाने तुम्ही घरासाठी दुप्पट पैसे देतात.

या सगळ्या परिस्थितीमध्ये जर तुम्हाला होमलोन घेतलेले पैसे भरायचेच आहेत परंतु तो पैसा वसूल देखील करावा असे वाटत असेल तर तुमच्यासाठी एसआयपी मध्ये केलेली गुंतवणूक खूप आर्थिकदृष्ट्या फायद्याचे ठरू शकते व या माध्यमातून तुम्ही घरासाठी भरलेली रक्कम वसूल देखील करू शकतात. त्यामुळे पटकन आपण या लेखात यासंबंधीची माहिती घेऊ.

 वीस वर्षाकरिता तीस लाखांचा गृहकर्ज घेतले तर किती व्याज भराव लागेल?

साधारणपणे सगळ्यात अगोदर आपण समजून घेऊ की जर तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून वीस वर्षाच्या कालावधी करिता 30 लाख रुपयांचे होमलोन घेतलं व बँकेच्या 9.55% व्याजदरासह तुम्हाला एकूण वीस वर्षात 67 लाख 34 हजार 871 रुपये बँकेला रक्कम भरावी लागेल. म्हणजेच तुम्ही घेतलेले कर्ज 30 लाख आणि त्यावर तुम्हाला व्याज द्यावे लागले 37 लाख 34 हजार 871 रुपये.

यामध्ये तुमचा मासिक ईएमआय असेल 28 हजार 62 रुपये आणि तोही जर संपूर्ण तीस वर्षांमध्ये व्याजदरात बदल झाला नाही व तो व्याजदर 9.55% राहिला तरच. जर व्याजदरामध्ये बदल झाला तर या व्याजाच्या भरलेल्या रकमेत देखील कमी जास्त बदल होऊ शकतो.  या कॅल्क्युलेशन वरून तुम्हाला कळले असेलच की तुम्ही घेतलेल्या होमलोनच्या बदल्यात किती पैसे बँकेला द्यावे लागले?

 एसआयपी द्वारे कशाप्रकारे रिकव्हर कराल होमलोनमध्ये भरलेली रक्कम?

जर तुम्ही होम लोनसाठी भरलेली संपूर्ण कर्ज आणि व्याजाची सगळी रक्कम जर तुम्हाला रिकव्हर करायची असेल तर एसआयपी हा प्रकार तुमच्यासाठी खूप फायद्याचा आहे. जेव्हा तुम्ही होमलोन घेतात व तुमचे ईएमआय सुरू होतात अगदी त्याच वेळेत तितक्याच कालावधी करिता जर तुम्ही महिन्याची एसआयपी सुरू केली तर तुम्हाला फायदा मिळू शकतो.

तुमचा होमलोनचा मासिक ईएमआय किती आहे त्यावर तुम्ही किती एसआयपी करावी हे ठरते. समजा तुमचा जो काही होमलोनचा ईएमआय आहे व त्या ईएमआय च्या वीस ते पंचवीस टक्क्यांपर्यंत जर तुम्ही एसआयपी करत असाल तर शेवटी जेव्हा तुम्ही होम लोनचा ईएमआय भरता अगदी तेवढेच पैसे तुम्ही एसआयपीच्या माध्यमातून मिळवू शकतात.

 होमलोनचे गणित या कॅल्क्युलेशनने समजून घेऊ

समजा तुम्ही वीस वर्षे कालावधी करिता तीस लाख रुपये होम लोन घेतले व त्याचा वार्षिक व्याजदर हा 9.55% आहे व त्याचा ईएमआय 28 हजार 62 रुपये आहे. तर तुमच्या एकूण 30 लाख रुपये कर्जावर तुम्ही 37 लाख 34 हजार 871 रुपये व्याजापोटी भरतात. एकूण मुद्दल 30 लाख व व्याज  म्हणून तुम्ही बँकेला 67 लाख 34 हजार 871 रुपये देतात.

 एसआयपीचे कॅल्क्युलेशन समजून घेऊ

समजा तुम्ही ईएमआयच्या 25% म्हणजेच तुमचा जो काही होम लोनचा 28 हजार 62 रुपये ईएमआय आहे त्याचा 25% म्हणजे 7015 इतकी एसआयपी प्रत्येक महिन्याला वीस वर्षाच्या कालावधी करिता केली व तुम्हाला अंदाजे परतावा हा 12% प्रति वर्ष या दराने मिळणारा असेल तर तुम्ही केलेल्या एसआयपी चे वीस वर्षानंतर झालेले मूल्य हे 70 लाख 9 हजार 23 रुपये असेल.

त्यामुळे या दोनही प्रकारच्या कॅल्क्युलेशन वरून तुमच्या लक्षात आलं असेल की होम लोन साठी भरलेले पैसे तुम्ही एसआयपीच्या माध्यमातून कसे वसूल करू शकतात?

 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe