Home Loan : स्वतःचे घर घेण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी गृहकर्जाची मोठी मदत होते. पण गृह कर्ज घेताना अनेकांना काही गोष्टी माहित नसतात, गृहकर्ज घेणारे बहुतेक लोक केवळ व्याज आणि प्रक्रिया शुल्काची चौकशी करतात. ज्यामुळे त्यांना कर्ज घेण्यापूर्वी बँकांकडून आकारण्यात येणाऱ्या विविध शुल्कांची कोणतीही माहिती मिळत नाही.
हेच छुपे शुल्क ग्राहकाच्या खिशावर अधिक भार पडतात. अशा परिस्थितीत ग्राहकांना ही माहिती असणे गरजेचे आहे. जर हे शुल्क काळजीपूर्वक समजले नाही, तर गृहकर्ज हा तोट्याचा सौदा ठरू शकतो.
छुपे शुल्क आणि त्यांचे दर प्रत्येक बँकेत बदलतात. हे शक्य आहे की एक बँक एखाद्या सेवेसाठी शुल्क आकारत असेल, तर दुसरी बँक तीच सेवा मोफत देत असेल. म्हणून, गृहकर्ज घेण्यापूर्वी, एखाद्याने व्याज आणि प्रक्रिया शुल्क तसेच बँकांच्या इतर शुल्कांची तुलना करणे आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला बँकांकडून आकारल्या जाणाऱ्या अशाच शुल्कांबद्दल सांगणार आहोत, ज्याची माहिती खूप कमी लोकांना असते.
बँकांकडून आकारले जाणारे छुपे शुल्क !
लॉगिन शुल्क
लॉगिन फी ज्याला प्रशासकीय फी किंवा अर्ज फी देखील म्हणतात. काही बँका तुम्ही कर्जासाठी अर्ज करता तेव्हा तुमचे कर्ज मंजूर होण्यापूर्वीच काही पैसे आकारतात. हे शुल्क साधारणपणे 2,500 ते 6,500 रुपयांपर्यंत असते. एकदा तुमचे कर्ज मंजूर झाल्यानंतर ही रक्कम तुमच्या प्रोसेसिंग फीमधून वजा केली जाते. जर कर्ज मंजूर झाले नाही तर लॉगिन फी परत केली जात नाही.
प्रीपेमेंट शुल्क
त्याला फोरक्लोजर चार्ज आणि प्रीक्लोजर चार्ज असेही म्हणतात. तुम्ही कार्यकाळ संपण्यापूर्वी तुमच्या गृहकर्जाची पूर्ण परतफेड केल्यास हे शुल्क लागू होते. ती थकबाकीच्या 2% ते 6% च्या दरम्यान आहे.
स्विचिंग चार्जेस
जेव्हा तुम्ही तुमच्या फ्लोटिंग-रेट पॅकेजला फिक्स्ड-रेट पॅकेजमध्ये किंवा फिक्स्ड-रेट पॅकेजमधून फ्लोटिंग रेट पॅकेजमध्ये रूपांतरित करता तेव्हा हे शुल्क लागू होतात. हे सर्वसाधारणपणे उर्वरित कर्जाच्या रकमेच्या 0.25 टक्के ते 3 टक्के असू शकते.
वसुली शुल्क
जेव्हा कर्जदार ईएमआय भरत नाही आणि त्याचे खाते डीफॉल्ट होते आणि बँकेला त्याच्याविरुद्ध कोणतीही कारवाई करावी लागते तेव्हा हे शुल्क आकारले जाते. या प्रक्रियेत खर्च केलेली रक्कम ग्राहकाकडून वसूल केली जाते.
कायदेशीर शुल्क
मालमत्तेचे मूल्यांकन असो किंवा विविध कागदपत्रांची पडताळणी असो, बँका या आवश्यकता पूर्ण करण्यासाठी कायदेशीर तज्ञांची नियुक्ती करतात. त्यांना या कामासाठी फी दिली जाते. त्यामुळे बँकाही गृहकर्जावर कायदेशीर शुल्क लागू करतात.
तपासणी शुल्क
ज्या मालमत्तेसाठी गृहकर्ज घेतले जाईल त्या मालमत्तेचे बाजार मूल्य मोजण्यासाठी बँक तांत्रिक तज्ञांची नियुक्ती करतात. हे तज्ञ अनेक पॅरामीटर्सवर मालमत्तेचे मूल्यांकन करतात. यासाठी बँका वेगळे शुल्क आकारतात.