Home Loan : घर घेण्याचे तुमचे स्वप्न ‘ही’ बँक पूर्ण करेल, बघा व्याजदर…

Published on -

Home Loan : जर तुम्ही सध्या घर घेण्याचा विचार करत असाल आणि तुम्हाला मोठ्या रकमेची गरज असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची ठरेल. आज आम्ही अशा एका बँकेबद्दल सांगणार आहोत, जिथे अगदी कमी व्याजदरात कर्ज मिळत आहे, ही बँक ग्राहकांना कमी व्याजदरात कर्ज ऑफर करत आहे तसेच त्यावर अनेक ऑफरही देत आहे.

सध्या प्रॉपर्टीच्या किमती इतक्या वाढल्या आहेत की, कर्जाशिवाय घर घेणे थोडे कठीण होते. वाढत्या महागाईमुळे तुम्ही कर्जाशिवाय तुमच्या स्वप्नातील घर खरेदी करू शकत नाही.

अनेकदा असे दिसून आले आहे की,गृहकर्ज घेण्यासाठी गेल्यावर लोकांचा मोठ्या प्रमाणात गोंधळ उडतो. अशास्थितीत कधीही बाजाराची माहिती घेतल्याशिवाय गृहकर्ज घेऊ नये. तुम्हाला कोणती बँक स्वस्त कर्ज ऑफर करेल तसेच कुठे चांगल्या ऑफर मिळतील हे तुम्ही आधी तपासले पाहिजे, म्हणजेच या सर्व गोष्टींची माहिती काढली पाहिजे.

देशात अशा बहुतांश बँका आहेत ज्या लोकांना गृहकर्ज देत आहेत. पण गोष्ट अशी आहे की कोणत्या बँकेत तुम्हाला सर्वात स्वस्त गृहकर्ज मिळेल हे माहिती असले पाहिजे. तसे पाहायला गेले तर देशातील सर्व मोठ्या बँकांमध्ये व्याजदर समान आहेत. यात फक्त थोडा फरक आहे.

पण देशात अशा अनेक बँका आहेत ज्या व्याजदर कमी ठेवतात. त्यामुळे बँकेत कर्ज घेणाऱ्यांची संख्या लक्षणीय वाढली आहे. जर आपण सर्वात कमी व्याजदराने गृहकर्ज देणाऱ्या बँकेबद्दल बोललो, तर बँक ऑफ इंडिया लोकांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी कमी दरात गृहकर्ज देत आहे. बँक ऑफ इंडिया लोकांना ८.३० टक्के व्याजदराने गृहकर्ज देत आहे.

याशिवाय उर्वरित बँका 8.35 टक्के ते 8.60 टक्के दराने गृहकर्ज देत आहेत. लक्षात घ्या गृहकर्जाचे व्याज अर्जदाराचा क्रेडिट स्कोअर, कर्जाची रक्कम आणि त्याच्या प्रोफाइलवर अवलंबून असते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe