वयाच्या चाळीशी नंतर Home Loan मिळवायचंय? ‘हे’ स्मार्ट फायनान्शिअल प्लॅनिंग तुम्हाला लाखोंचा फायदा करून देतील

जर तुम्ही 40 वर्षांनंतर गृहकर्ज घेण्याचा विचार करत असाल तर काही महत्त्वाच्या गोष्टींची माहिती घेणे गरजेचे आहे. गृहकर्ज हा एक मोठा आर्थिक निर्णय असतो आणि त्याचा तुमच्या आर्थिक स्थैर्यावर दीर्घकालीन परिणाम होतो. म्हणूनच योग्य नियोजन आणि माहितीच्या आधारेच कर्ज घ्यावे.

Ratnakar Ashok Patil
Updated:

Home Loan Tips:- जर तुम्ही 40 वर्षांनंतर गृहकर्ज घेण्याचा विचार करत असाल तर काही महत्त्वाच्या गोष्टींची माहिती घेणे गरजेचे आहे. गृहकर्ज हा एक मोठा आर्थिक निर्णय असतो आणि त्याचा तुमच्या आर्थिक स्थैर्यावर दीर्घकालीन परिणाम होतो. म्हणूनच योग्य नियोजन आणि माहितीच्या आधारेच कर्ज घ्यावे.

होम लोन घेण्याआधी या गोष्टींचा विचार करा

गृहकर्जाचा कालावधी आणि EMI नियोजन

सहसा बँका 30 वर्षांपर्यंत गृहकर्जाचा कालावधी देतात. परंतु जर तुम्ही 40 वर्षांनंतर कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर बँका तुमचे निवृत्तीचे वय लक्षात घेतात आणि कालावधी कमी होऊ शकतो.

उदा. जर तुमची निवृत्ती 60 व्या वर्षी होणार असेल आणि तुम्ही 40 व्या वर्षी कर्ज घेत असाल, तर बँक तुम्हाला फक्त 20 वर्षांसाठीच कर्ज देऊ शकते. याचा परिणाम तुमच्या मासिक EMI (मासिक हफ्ता) वर होईल आणि तो जास्त येईल.

जर तुम्ही EMI चा भार कमी करायचा असेल तर तुम्ही खालील उपाय करू शकता

क्रेडिट स्कोअर सुधारावा

चांगला क्रेडिट स्कोअर (750 किंवा त्याहून अधिक) असेल, तर तुम्हाला चांगल्या अटींवर कर्ज मिळू शकते.

स्थिर नोकरी आणि उत्पन्न असावे

जर तुमच्या नोकरीची स्थिती स्थिर असेल आणि तुम्हाला चांगले उत्पन्न मिळत असेल, तर बँका तुम्हाला कर्ज देताना अधिक लवचिक राहतात.

निवृत्तीनंतर परतफेडीचा पर्याय

काही बँका तुम्हाला निवृत्तीनंतरही कर्जाची परतफेड करण्याची संधी देऊ शकतात. परंतु त्यासाठी त्यांना तुमच्या उत्पन्नाचा दुसरा स्रोत (उदा. भाडे उत्पन्न किंवा गुंतवणुकीतील परतावा) दिसणे आवश्यक आहे.

संयुक्त गृहकर्जाचा विचार करा

जर तुमच्या जोडीदाराकडेही उत्पन्नाचा स्थिर स्रोत असेल तर संयुक्त गृहकर्ज घेण्याचा विचार करा. संयुक्त कर्जामुळे खालील फायदे मिळू शकतात…..

जास्त कर्ज मिळू शकते

दोघांच्या मिळून उत्पन्नाचा विचार करून बँक जास्त कर्ज देऊ शकते.

EMI चा भार कमी होतो

जर दोघेही EMI भरत असतील तर वैयक्तिक आर्थिक ओझे कमी होऊ शकते.

व्याजदर कमी होण्याची संधी

काही बँका महिलांना गृहकर्जावर व्याजदरात सूट देतात. जर पत्नी सह-अर्जदार असेल तर व्याजदर थोडा कमी लागू शकतो.

कर बचत होते

संयुक्त गृहकर्ज घेतल्यास दोघेही करसवलतीच्या (Tax Benefits) लाभास पात्र होतात.

जास्त डाउन पेमेंट करण्याचा प्रयत्न करा

गृहकर्ज घेताना जितके जास्त डाउन पेमेंट कराल तितका कर्जाचा भार कमी होईल.

डाउन पेमेंट का महत्त्वाचे आहे?

बँका साधारणपणे घराच्या किमतीच्या 75-80% पर्यंत कर्ज देतात. उरलेली रक्कम ग्राहकाने डाउनपेमेंट म्हणून भरावी लागते.

डाउन पेमेंट मोठे असल्यास फायदे

मासिक EMI कमी होतो आणि दीर्घकालीन आर्थिक स्थैर्य टिकवता येते.एकूण व्याजाचा भार कमी होतो.कारण कमी कर्ज घेतल्यास व्याजही कमी भरावे लागते.कमी कर्ज असल्यामुळे परतफेड करणे सोपे होते आणि कर्जाच्या दडपणाखाली यावे लागत नाही.

डाउन पेमेंट करताना घ्यायची काळजी

आर्थिक ताण येणार नाही याची खात्री करा.वैद्यकीय किंवा इतर आपत्कालीन परिस्थितीसाठी राखीव निधी बाजूला ठेवा.
संपूर्ण बचत डाउन पेमेंटसाठी वापरू नका. अन्यथा भविष्यात इतर खर्चांसाठी समस्या निर्माण होऊ शकते.

एकरकमी परतफेडीचे नियोजन करा

गृहकर्जाचा कालावधी जितका जास्त असेल तितके जास्त व्याज तुम्हाला भरावे लागते. त्यामुळे शक्य असल्यास कर्जाची एकरकमी परतफेड करणे फायदेशीर ठरू शकते.

एकरकमी परतफेड कधी करावी?

जर तुम्हाला बोनस, ग्रॅच्युइटी किंवा वारसाहक्काने मोठी रक्कम मिळाली असेल तर ती थेट गृहकर्जाच्या परतफेडीसाठी वापरा.निवृत्तीच्या आधीच मोठी रक्कम फेडल्यास व्याजाचा भार कमी होतो आणि आर्थिक स्थैर्य राहते.

परतफेडीच्या पद्धती

पूर्ण कर्जाची परतफेड करणे आणि कर्जाचा काही भाग एकरकमी फेडणे या होय.

निवृत्ती निधी वापरणे टाळा

काही लोक आपल्या पीएफ (Provident Fund) किंवा निवृत्ती निधीचा उपयोग गृहकर्ज फेडण्यासाठी करतात. मात्र निवृत्तीनंतर उत्पन्नाचे मुख्य साधन नसल्यास भविष्यातील आर्थिक संकट टाळण्यासाठी हा निधी गृहकर्जासाठी वापरणे टाळावे.

योग्य कर्जदाता निवडण्याची काळजी घ्या

आजच्या काळात बँका आणि वित्तीय संस्थांकडून वेगवेगळ्या प्रकारच्या गृहकर्ज सुविधा दिल्या जातात. त्यामुळे गृहकर्ज घेण्यापूर्वी योग्य कर्जदाता निवडण्यासाठी खालील गोष्टी लक्षात घ्या

फक्त व्याजदर पाहू नका

कमी व्याजदर महत्त्वाचा असतो, पण त्यासोबतच इतर शुल्क, उदा. प्रोसेसिंग फी, प्री-पेमेंट शुल्क, डॉक्युमेंटेशन चार्जेस यांची माहिती घ्या.

परतफेडीची लवचिकता

काही बँका कर्जाच्या मुदतीत फिक्स्ड व्याजदर आणि फ्लोटिंग व्याजदराचा पर्याय देतात. त्यामुळे परतफेडीची लवचिकता तपासा.

कर्ज प्रक्रियेत पारदर्शकता

काही वित्तीय संस्थांकडून गृहकर्ज मिळवणे सोपे असते. पण त्यात लपवलेले शुल्क असू शकतात. त्यामुळे कराराच्या सर्व अटी काळजीपूर्वक वाचा.

ऑनलाइन सुविधा आणि सेवा

काही बँका गृहकर्जासंबंधी उत्तम डिजिटल सुविधा देतात. जसे की EMI कॅल्क्युलेटर, ऑनलाइन स्टेटमेंट, प्री-पेमेंट पर्याय, यामुळे कर्ज व्यवस्थापन सोपे होते.

होमलोन करिता उत्तम नियोजन महत्वाचे

४० वर्षांनंतर गृहकर्ज घेणे शक्य आहे.पण त्यासाठी नीट नियोजन करणे गरजेचे आहे. गृहकर्ज घेताना EMI नियोजन, डाउन पेमेंट, संयुक्त कर्जाचा विचार, एकरकमी परतफेड आणि योग्य कर्जदाता निवडणे हे सर्व महत्त्वाचे घटक आहेत. जर या गोष्टींची योग्य माहिती घेतली आणि नियोजन केले तर गृहकर्जाची परतफेड सोपी होईल आणि निवृत्तीनंतरही आर्थिक स्थैर्य टिकवता येईल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe