Home Loan : नवीन घर खरेदी करणार आहात का ? मग आजची बातमी तुमच्या कामाची राहणार आहे. खरेतर, आजकाल घरांच्या किमती प्रचंड वाढल्या आहेत. यामुळे केस मध्ये घर खरेदी करणे सर्वांनाच जमत नाही. यामुळे घर खरेदी करण्यासाठी आपल्याला अनेकदा गृह कर्ज घ्यावे लागते.
दरम्यान जर तुम्हीही नव्याने घर खरेदी करण्यासाठी होम लोन घेण्याचा तयारीत असाल तर आज आम्ही तुमच्यासाठी एक महत्त्वाची माहिती घेऊन आलो आहोत. नव्याने घर खरेदी करण्यासाठी तुमचे बजेट किती असायला हवेत तुमचे वार्षिक उत्पन्न किती हवे याबाबतची सविस्तर माहिती आज आपण या लेखातून समजून घेणार आहोत.

ज्यांना एक कोटी रुपयांचे घर घ्यायचे असेल तर त्यांचे वार्षिक उत्पन्न किती हवे? जेणेकरून त्यांना आर्थिक नियोजन करता येणे शक्य होईल याविषयीचा आढावा आज आपण या लेखातून घेणार आहोत. सध्या घरांच्या किमती प्रचंड वाढल्या आहे.
मुंबई पुण्यासारख्या शहरांमध्ये तर सर्वसामान्यांना घर खरेदी करणे म्हणजेच दिवसाढवळ्या स्वप्न पाहण्यासारखे आहे. मात्र, काही लोक आपल्या मनपसंत शहरात आणि आवडत्या लोकेशनवर घर खरेदी करताना आपल्या घराच्या बजेटचा विचार करत नाहीत.
ते आपल्या आवडत्या घरासाठी आवाक्याबाहेरचे गृह कर्ज काढतात आणि दरमहा फक्त ईएमआय भरावे लागतील असा विचार करून महागडे घर खरेदी करतात. परंतु घर खरेदी करताना नेहमी आपल्या मासिक उत्पन्नाचा अन नोकरीच्या स्थिरतेचा विचार करून घराचे बजेट तयार करावे लागते.
तुम्हाला तुमच्या घराचे बजेट ठरवण्यासाठी तुमच्या वार्षिक उत्पन्नाकडे लक्ष द्यावे लागणार असे तज्ञ आवर्जून सांगतात. तुम्ही तुमच्या वार्षिक उत्पन्नाच्या 3 ते 5 टक्क्यांपेक्षा जास्त किंमतीत कदापि घर खरेदी करू नये.
म्हणजेच जर तुमचे वार्षिक उत्पन्न 20 लाख रुपये असेल तर तुम्ही 60 लाख ते 1 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये घर खरेदी करू शकता. मात्र हा एक अंदाज आहे. तुम्ही घरासाठी किती बजेट ठरवणार हे तुमच्या इतर खर्चांवर सुद्धा अवलंबून असेल.
जसे की काही लोकांना एकापेक्षा जास्त परिवाराचा भार उचलावा लागतो. त्यांच्या कुटुंबातील लोकांची संख्या अधिक असते. काही कुटुंबात मेडिकल खर्च अधिक असतो. यामुळे घर खरेदी करण्यासाठी तुम्ही सर्वच प्रकारच्या गोष्टी तपासून मगच बजेट तयार करा.
पण सर्वसाधारणपणे ज्या लोकांचे वार्षिक उत्पन्न 20 लाख रुपयांचे आहे म्हणजेच महिन्याचा पगार साधारणपणे 66 लाख किंवा त्यापेक्षा अधिक आहे त्या लोकांनी एक कोटी रुपयांचे घर खरेदी करायला काही हरकत नाही.













