तुमची बायको तुमच्या गृहकर्जाचा हप्ता कमी करू शकते, 1-2 लाख नाही तब्बल 7 लाख रुपये वाचतील !

संयुक्त गृह कर्ज घेतल्यास बँकेकडून लवकरात लवकर कर्ज मंजूर केले जाते. जर तुम्ही तुमच्या पत्नी समवेत गृह कर्ज घेतले तर तुम्हाला आणि तुमच्या पत्नीला दोघांनाही आयकर लाभ मिळणार आहेत. मात्र यासाठी सदर मालमत्ता पती आणि पत्नी दोघांच्या मालकीची असणे आवश्यक आहे.

Updated on -

Home Loan : स्वतःचे एक हक्काचे घर असावे असे स्वप्न प्रत्येकजण पाहतो. तुम्हीही असे स्वप्न पाहिले असेल नाही का? मात्र घर खरेदी करणे ही काही सोपी बाब नाही. गृह खरेदीसाठी आयुष्यभर जमा केलेली जमापुंजी लावावी लागते. पण ही जमा केलेली जमापुंजी घर खरेदी करण्यासाठी खर्ची करण्याचा निर्णय घेतला तरी आवश्यक असणारी रक्कम जमा होत नाही.

अशावेळी मग आपल्यापुढे पर्याय उभा राहतो तो गृह कर्जाचा. आतापर्यंत कित्येक लोकांनी गृह कर्जाचा पर्याय स्वीकारून आपल्या हक्काचे, स्वप्नातील टुमदार घराचे स्वप्न अगदी थाटात पूर्ण केले आहे.

दरम्यान, जर तुम्हीही याचं लोकांप्रमाणे गृह खरेदीसाठी कर्ज काढण्यासाठी बँकेत जाणार असाल तर थोडं थांबा, आजची ही बातमी पूर्ण वाचा आणि मग निवांत बँकेत जा. खरंतर आज आपण संयुक्त गृह कर्जाची माहिती जाणून घेणार आहोत. जर तुम्ही तुमच्या बायकोसमवेत संयुक्त गृह कर्ज घेतले तर तुम्हाला कोणते फायदे मिळू शकतात याविषयी आता आपण माहिती पाहूया.

बायकोसोबत संयुक्त गृह कर्ज घेण्याचे फायदे

तुम्ही तुमच्या बायकोसमवेत किंवा इतर महिला अर्जदारासोबत संयुक्त गृहकर्ज घेतले तर तुम्हाला अनेक लाभ मिळतील. महिला अर्जदारासमवेत संयुक्त गृह कर्ज घेतले तर बँका कमी इंटरेस्ट रेट मध्ये कर्ज देतील.

यामुळे तुम्ही आई, पत्नी , बहीण यांसोबत संयुक्त गृहकर्ज घेतले पाहिजे असा सल्ला जाणकारांनी दिला आहे. एकट्याने गृह कर्ज घेण्यापेक्षा संयुक्त गृह कर्ज घेणे कधीही फायद्याचे राहते.

जर तुम्ही तुमच्या पत्नीसोबत संयुक्त कर्ज घेतले तर तुम्हाला कमी व्याजदराने गृहकर्ज मिळणार आहे. साहजिकच यामुळे तुमचा कर्जाचा हप्ता कमी होणार आहे. तुमचे व्याजाचे पैसे वाचणार आहेत. तसेच तुमचा टॅक्सही वाचणार आहे.

विशेष म्हणजे संयुक्त गृह कर्ज घेतल्यास बँकेकडून लवकरात लवकर कर्ज मंजूर केले जाते. जर तुम्ही तुमच्या पत्नी समवेत गृह कर्ज घेतले तर तुम्हाला आणि तुमच्या पत्नीला दोघांनाही आयकर लाभ मिळणार आहेत. मात्र यासाठी सदर मालमत्ता पती आणि पत्नी दोघांच्या मालकीची असणे आवश्यक आहे.

कसे वाचणार 7 लाख ?

पती-पत्नीच्या नावावर मालमत्ता असेल आणि यासाठी कर्ज घेतले असेल तर अशा प्रकरणात 80C अंतर्गत पती आणि पत्नी दोघांना प्रत्येकी 1.5 लाख रुपये म्हणजेच एकूण 3 लाख रुपयांचा लाभ मिळणार आहे.

एवढेच नाही तर पती-पत्नी दोघांना व्याजावर 2 लाख रुपयांचा कर लाभ मिळणार आहे. म्हणजेच पती-पत्नी यांनी संयुक्त कर्ज घेतले तर सात लाख रुपयांपर्यंतची बचत होणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News