SIP Investment Plan : आपल्यापैकी अनेकांना गुंतवणूक करायची असते. मात्र कुठे गुंतवणूक करावी हे सुचत नाही. खरे तर, गुंतवणुकीचे वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवणूक केली जाऊ शकते. सुरक्षित गुंतवणुकीसाठी पोस्ट ऑफिस स्कीम, एलआयसी स्कीम, बँकेतील FD अशा विविध ठिकाणी गुंतवणूक केली जाऊ शकते. पण जर तुमची थोडीशी रिस्क घेण्याची तयारी असेल तर तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये देखील गुंतवणूक करू शकता.
म्युचल फंड मध्ये सिस्टीमेटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन थ्रो अर्थातच एसआयपी करून तुम्ही एका ठराविक कालावधीनंतर चांगला मोठा फंड जमा करू शकता. ज्या लोकांना थेट शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणे खूपच जोखीम पूर्ण वाटते किंवा रिस्की वाटते अशा लोकांसाठी एस आय पी हा एक बेस्ट पर्याय ठरू शकतो. एसआयपी मध्ये देखील रिस्क आहे मात्र येथे खूपच कमी रिस्क असते. तथापि ज्या लोकांना एसआयपी करायचे असते त्यांचे अनेक प्रश्न असतात.
अनेकांच्या माध्यमातून तर 5 लाखाचा फंड तयार करण्यासाठी किती रुपयांची एसआयपी करावी लागेल आणि किती दिवसांसाठी ही एसआयपी सुरू ठेवावी लागेल असा प्रश्न उपस्थित केला जात होता. अशा परिस्थितीत आज आपण या प्रश्नाचे उत्तर थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
5 लाखाचा फंड तयार करण्यासाठी किती रुपयाची गुंतवणूक करावी लागेल
जर तुम्हाला 5 वर्षांच्या काळात 5 लाखाचा फंड तयार करायचा असेल तर तुम्हाला प्रत्येक महिन्याला साडेपाच हजार रुपयांची एसआयपी करावी लागणार आहे. दर महिन्याला साडेपाच हजार रुपये एसआयपी मध्ये गुंतवले तर तुम्ही पाच वर्षात पाच लाख रुपयांचा फंड तयार करू शकता.
SIP Calculator नुसार, जर तुम्ही 5500 रुपयांची दरमहा गुंतवणूक केली आणि ही गुंतवणूक पाच वर्षांसाठी सुरू ठेवली अन तुम्हाला या गुंतवणुकीवर जर 15 टक्के एवढे रिटर्न मिळालेत तर पाच वर्षानंतर तुम्ही 4 लाख 93,249 रुपयाचा फंड तयार करू शकतात. यात तुमची गुंतवणूक तीन लाख 30 हजार रुपयाची राहील आणि एक लाख 63 हजार 249 रुपये तुम्हाला रिटर्न म्हणून मिळणार आहेत.