EPFO किती बॅलन्स आहे? नुसता मिस्ड काँल दिला तरी समजेल खात्यातील पैसे

Published on -

खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी सरकारने भविष्य निर्वाह निधी योजना सुरु केली आहे. ही सर्वात सुरक्षित व विश्वासार्ह योजना समजली जाते. त्यात कर्मचाऱ्यांच्या मुळ पगाराच्या किंवा महागाई भत्त्याच्या 12 टक्के रक्कम योगदान म्हणून भरली जाते. तेवढीच रक्कम कंपनी मालकाकडूनही घेतली जाते. या रकमेवर ईपीएफओ दरवर्षी व्याज देते. आता तुमच्या खात्यावर किती रक्कम जमा झालीय, हे तुम्हाला अगदी मिस्ड काँलद्वारेही समजणार आहे.

बॅलन्स समजण्याचे सोपे मार्ग

जर तुम्ही ईपीएफ ग्राहक असाल आणि तुमच्या खात्याचे तपशील तपासायचे असतील, तर यासाठी तुमचा युनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN) बँक खाते, आधार किंवा पॅनशी लिंक केलेला असावा. येथे आम्ही पीएफ खात्याची माहिती तपासण्याचे 3 सोपे मार्ग सांगत आहोत.

1. ईपीएफओ मोबाईल अॅप

आवश्यकता: UAN, नोंदणीकृत मोबाइल नंबर, EPFO ​​अॅप
कसे चेक करायचे
– अ‍ॅप स्टोअर वरून ईपीएफओ अ‍ॅप (एम-ईपीएफ) डाउनलोड करा.
– UAN आणि पासवर्ड किंवा OTP वापरून लॉग इन करा.
– पीएफ बॅलन्स, पासबुक किंवा क्लेम स्टेटस अॅक्सेस करा.
– फायदा: वापरकर्ता-अनुकूल इंटरफेस, पीएफ तपशीलांवर त्वरित प्रवेश.

2. एसएमएस द्वारे

आवश्यकता: UAN शी लिंक केलेला नोंदणीकृत मोबाइल नंबर
कसे चेक करायचे
– EPFOHO UAN ENG फॉरमॅटमध्ये ७७३८२९९८९९ वर एसएमएस पाठवा.
– तुम्ही “ENG” च्या जागी तुमच्या पसंतीच्या भाषेचा कोड देखील वापरू शकता (उदाहरणार्थ, हिंदीसाठी HIN).
– पीएफ बॅलन्सची माहिती एसएमएसद्वारे उपलब्ध होईल.
– फायदा: इंटरनेटची आवश्यकता नाही, जलद प्रतिसाद.

3. मिस्ड कॉल सेवा

आवश्यकता: UAN शी लिंक केलेला नोंदणीकृत मोबाइल नंबर
कसे चेक करायचे
– तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवरून ९९६६०४४४२५ वर मिस्ड कॉल द्या.
– पीएफ बॅलन्सची माहिती एसएमएसद्वारे उपलब्ध होईल.
– फायदा: मोफत. इंटरनेट किंवा अॅपची आवश्यकता नाही.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News