पंजाब नॅशनल बँकेत 300 दिवसांसाठी एक लाख रुपयांची एफडी केली तर किती रिटर्न मिळणार, पहा…

Ahmednagarlive24 office
Published:
Punjab National Bank FD Scheme

Punjab National Bank FD Scheme : अलीकडे आपल्या देशात एफडी करण्याला विशेष महत्त्व प्राप्त होऊ लागले आहे. याचे कारणही तसे खासच आहे. गेल्या काही वर्षात रिझर्व बँक ऑफ इंडियाने रेपो रेट मध्ये मोठी वाढ केली आहे.

आता रेपो रेट मध्ये वाढ झाली म्हणजेच एफ डी वरील व्याजदरात देखील वाढ होते. यामुळे एफडी करणाऱ्यांना चांगला परतावा मिळू लागला आहे. परिणामी अनेकजण आता गुंतवणुकीसाठी एफडीचा पर्याय स्वीकारत असल्याचे पाहायला मिळत आहे.

दरम्यान आजची ही बातमी देखील एफडी अर्थातच फिक्स डिपॉझिट करू इच्छिणाऱ्यांसाठी विशेष खास राहणार आहे. कारण की आज आपण पंजाब नॅशनल बँकेत 300 दिवसांसाठी एक लाख रुपयांची मुदत ठेव किंवा FD केली तर गुंतवणूकदारांना किती रिटर्न मिळू शकतो याविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

खरे तर सध्या एफ डी साठी अनेक बँका चांगले व्याजदर ऑफर करत आहेत. वेगवेगळ्या कालावधीसाठी एफडीवर वेगवेगळे व्याजदर मिळते. अनेक बँका आता FD साठी आठ ते साडेआठ टक्क्यांपर्यंतचे व्याजदर देखील ऑफर करत आहेत.

मात्र व्याजदर हे एफडीच्या कालावधीवर अवलंबून असते हे गुंतवणूकदारांनी समजून घेणे आवश्यक आहे. दरम्यान तज्ञ लोकांनी एफडी करू इच्छिणाऱ्यांना सध्याचा कालावधी हा FD करण्यासाठी सर्वोत्कृष्ट असल्याचे सांगितले आहे.

यामुळे अनेक जण FD करण्याच्या तयारीत आहेत. जर तुम्हीही पंजाब नॅशनल बँकेत एफडी करू इच्छित असाल तर आधी येथे एफडी करण्याचे संपूर्ण गणित समजून घ्या.

पंजाब नॅशनल बँक किती व्याज देते

पंजाब नॅशनल बँक ने नुकताच एक मोठा निर्णय घेतला आहे. यानुसार बँकेने 300 दिवसांच्या एफडीसाठी दिल्या जाणाऱ्या व्याजदरात 0.80 टक्क्यांची वाढ केली आहे. त्यानुसार आता 300 दिवसांसाठी या बँकेत एफडी केली तर गुंतवणूकदारांना 7.05% एवढा परतावा मिळत आहे.

अशा परिस्थितीत जर या बँकेत गुंतवणूकदाराने 300 दिवसांसाठी एक लाख रुपयाची एफडी केली तर 7.05% व्याजदराने सदर गुंतवणूकदाराला मॅच्युरिटी वर 1 लाख 5,759 रुपये मिळणार आहेत. यामध्ये पाच हजार 759 रुपये एवढे व्याज राहणार आहे.

मात्र बँकेच्या माध्यमातून वरिष्ठ नागरिकांना FD वर 0.50% अधिकचा परतावा मिळत आहे. यामुळे वरिष्ठ नागरिकांना या अतिरिक्त व्याजदराचा फायदा मिळू शकणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe