HDFC बँकेत 1 लाख रुपयाची FD केली तर किती रिटर्न मिळणार ? वाचा संपूर्ण कॅल्क्युलेशन

Published on -

HDFC Bank FD Returns : अलीकडे भारतातील बहुतांशी लोक शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड सारख्या जोखीमपूर्ण गुंतवणुकीकडे वळले आहेत. शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड यामधील गुंतवणूक रिस्की असते मात्र यामधून चांगला परतावा मिळत असल्याने येथे गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. परंतु, आजही देशात असे अनेक लोक आहेत ज्यांना सुरक्षित गुंतवणूक आवडते.

असे लोक आजही बँकेतील एफडी, पोस्ट ऑफिस मधील डिपॉझिट योजना तसेच एलआयसीच्या छोट्या-मोठ्या बचत योजनांमध्ये गुंतवणूक करतात. या अशा बचत योजनांमधून आणि एफडीमधून मिळणारा परतावा हा म्युच्युअल फंड आणि शेअर मार्केटच्या तुलनेत कमी असला तरी देखील यामध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. हेच कारण आहे की, बँकेत एफडी करणाऱ्या ग्राहकांसाठी बँकेच्या माध्यमातून वेगवेगळ्या योजना देखील चालवल्या जात आहेत. देशातील विविध बँका एफडी करणाऱ्यांना चांगले व्याजदर देखील देत आहे.

एचडीएफसी बँक देखील आपल्या ग्राहकांना एफडीवर चांगले व्याजदर ऑफर करत आहे. दरम्यान FD करू इच्छिणाऱ्या नागरिकांच्या माध्यमातून जर एचडीएफसी बँकेत एक लाख रुपयांची एफडी केली तर किती रिटर्न मिळणार हा प्रश्न उपस्थित केला जात होता. अशा परिस्थितीत आज आपण या प्रश्नाचे उत्तर थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

मिळालेल्या माहितीनुसार, एचडीएफसी या देशातील सर्वात मोठ्या प्रायव्हेट बँकेत जर गुंतवणूकदारांनी 15 महिन्यांसाठी एक लाख रुपयांची रक्कम मुदत ठेव ठेवली तर सदर गुंतवणूकदाराला या गुंतवणुकीवर बँकेकडून 7.10 टक्के व्याजदराने व्याज दिले जाणार आहे. तसेच जर गुंतवणूकदार ज्येष्ठ नागरिक असतील तर त्यांना 0.50% अधिक व्याजदर मिळणार आहे. म्हणजेच ज्येष्ठ नागरिकांनी 15 महिन्यांसाठीच्या मुदत ठेवीवर 7.60% व्याजदराने व्याज दिले जाणार आहे.

अशा परिस्थितीत जर एखाद्या सर्वसामान्य गुंतवणूकदाराने 15 महिन्यांसाठी HDFC बँकेत 1 लाख रुपयांची मुदत ठेव म्हणजे FD केली तर सदर गुंतवणूकदाराला 7.1% व्याजदराने बँकेकडून 15 महिन्यांच्या मुदत ठेवीवर 9,169 रुपये व्याज ऑफर केले जाणार आहे. मात्र बँकेकडून दिला जाणारा हा व्याजदर फक्त पंधरा महिन्यांच्या एफडीसाठी राहणार आहे याची नोंद गुंतवणूकदारांनी घ्यायची आहे. म्हणजे एफडीच्या कालावधीनुसार व्याजदरात बदल होत राहणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe