GST On Scooter : कित्येक वर्षांनी केंद्रातील मोदी सरकारने जीएसटी मध्ये रिफॉर्म आणला आहे. ऑगस्ट महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून लवकरच सर्वसामान्यांना दिलासा मिळणार असे सांगितले. त्यावेळी मोदींनी जीएसटीचे रेट कमी होणार असे संकेत दिले होते. यानुसार आता केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जीएसटी कौन्सिलच्या 56 व्या बैठकीत अनेक वस्तूंवरील जीएसटी कमी केली आहे. यावेळी कौन्सिलच्या बैठकीत सरकारने दोन जीएसटी स्लॅब रद्द करण्याची घोषणा केली आहे. 12% आणि 28% हे दोन जीएसटी स्लॅब सरकारकडून रद्द करण्यात आले आहेत.
आता फक्त पाच टक्के आणि 18% हे दोन जीएसटी स्लॅब शिल्लक राहिले आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे सरकारकडून अनेक अत्यावश्यक वस्तूंवरील जीएसटी 12, 18 अन 28 टक्क्यांवरून पाच टक्के करण्यात आली आहे. कृषी यंत्रांची जीएसटी देखील पाच टक्क्यांवर आली आहे. सोबतच काही जीवनावश्यक वस्तूंची जीएसटी शून्य करण्यात आली आहे.

काही दुचाकी आणि चार चाकी वाहनांवरील जीएसटी सुद्धा 28 टक्क्यांवरून 18% करण्याची घोषणा करण्यात आली आहे. यामुळे चार चाकी वाहनांच्या किमती लाखांच्या घरात कमी होतील आणि दुचाकींच्या किमती हजारोंच्या घरात कमी होतील अशी अशा व्यक्त करण्यात आली आहे. अशा स्थितीत आता आपण होंडा एक्टिवा आणि टीव्हीएस ज्युपिटर सहित देशातील सर्वच प्रमुख कंपन्यांच्या स्कूटरच्या किमती कितीने कमी होऊ शकतात याचा थोडक्यात आढावा घेणार आहोत.
स्कूटर च्या किमती किती रुपयांनी कमी होणार
होंडा अॅक्टिव्हा 125 सीसी – 6,750 रुपये
TVS Jupiter 125 CC – 6,333 रुपये
Suzuki Access 125 CC – 6,611 रुपये
Hero Maestro Edge 125 सीसी – 6,389
होंडा डिओ 125 – 6,222 रुपये
सुझुकी बर्गमन स्ट्रीट 125 – 6,444 रुपये
यामाहा फॅसिनो 125 – 5,333 रुपये
हिरो डेस्टिनी 125 – 5389
एप्रिलिया एसआर 125 – 6852