NSC Scheme: कसे मिळेल 5 वर्षात 5 लाख रुपये व्याज? समजून घ्या संपूर्ण गणित

Published on -

NSC Scheme:- एखाद्या छोट्याशा गुंतवणुकीमधून जर तुम्हाला मोठ्या प्रमाणावर निधी जमा करायचा असेल तर त्याकरिता दीर्घकालीन गुंतवणूक करणे गरजेचे असते व या गुंतवणुकीत सातत्य असणे देखील तितकेच महत्त्वाचे असते. जेव्हा गुंतवणुकीसाठी हा नियम पाळला जातो तेव्हा निश्चितच काही वर्षानंतर गुंतवणुकीतून चांगला परतावा हा मिळत असतो. तसेच गुंतवणुकीच्या बाबतीत सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही ज्याही ठिकाणी गुंतवणूक करत आहात त्या ठिकाणी तुमचे पैसे सुरक्षित राहणे गरजेचे असतेच व त्या गुंतवलेल्या पैशातून तुम्हाला चांगले रिटर्न मिळतील हे देखील पाहणे महत्त्वाचे असते. याच अनुषंगाने प्रत्येक गुंतवणूकदार असा सगळा विचार करूनच गुंतवणूक पर्याय निवडत असतात. अशाच प्रकारे तुम्ही देखील एखादा गुंतवणूक पर्याय शोधत असाल तर या लेखात आपण पोस्ट ऑफिसच्या नॅशनल सेविंग सर्टिफिकेट अर्थात एनएससी या महत्त्वाच्या योजनेची माहिती घेणार आहोत. जे तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीचे सरकारी हमी तर देईलच परंतु त्यावर उत्तम परतावा देखील तुम्हाला मिळू शकतो.

पोस्ट ऑफिसची नॅशनल सेविंग सर्टिफिकेट योजना

पोस्ट ऑफिसची नॅशनल सेविंग सर्टिफिकेट अर्थात एनएससी ही एक अतिशय फायद्याची अशी छोटी बचत योजना आहे. या योजनेत तुम्ही केलेल्या गुंतवणुकीवर जे काही व्याज मिळते ते चक्रवाढ पद्धतीने दरवर्षी वाढत राहते. सध्या या योजनेत गुंतवणुकीवर 7.7% वार्षिक व्याज मिळत असून यावर मिळणाऱ्या चक्रवाढीमुळे जास्तीचा फायदा गुंतवणूकदारांना मिळतो. या योजनेत जर तुम्हाला पाच वर्षात पाच लाख रुपये मिळवायचे असतील तर याकरिता तुम्हाला एका वेळी अकरा लाख रुपयांची गुंतवणूक करणे गरजेचे आहे व पाच वर्षानंतर चक्रवाढ व्याजासह तुम्हाला तुमची एकूण गुंतवणूक आणि त्यावर मिळणारे व्याज असे मिळून 15 लाख 93 हजार 937 रुपये मिळतात. म्हणजेच तुम्हाला चार लाख 93 हजार 937 रुपये निव्वळ व्याजापोटी मिळतात.

म्हणजेच तुम्हाला पाच वर्षात पाच लाख रुपये नुसते व्याजापोटी फायदा मिळवता येऊ शकतो. परंतु तुमच्याकडे जर अकरा लाख रुपयासारखी मोठी रक्कम नसेल तर तुम्ही हजार रुपयांपासून देखील या योजनेत खाते उघडू शकतात व जास्तीत जास्त कितीही पैशांची गुंतवणूक यामध्ये तुम्हाला करता येते. तसेच या योजनेतून अपेक्षित फायदा मिळवण्यासाठी तुम्हाला पूर्ण पाच वर्षापर्यंत यामध्ये गुंतवणूक करणे गरजेचे असते. तसेच या योजनेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या योजनेच्या माध्यमातून एका आर्थिक वर्षांमध्ये 1 लाख 50 हजार रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीवर कर देखील वाचवता येऊ शकतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe