पेट्रोल पंप पाहिल्यावर मनात विचार येतो की, आपलाही एखादा पंप असावा. बसल्याजागी बख्खळ कमाई. परंतु, पेट्रोल पंप सुरु करण्याची प्रोसेसही अनेक जण शोधत असतात. आज आम्ही तुम्हाला पेट्रोल पंप सुरु करण्यासाठी काय करावे लागते व पेट्रोल पंप चालकांना एका लिटरमागे किती पैसे मिळतात, ते पाहूयात…
पेट्रोल पंपाला किती पैसे लागतात
ग्रामीण भागात पेट्रोल पंप सुरु करण्यासाठी साधारणः 12 ते 15 लाखांचा खर्च येतो. शहरी भागात तोच खर्च 20 ते 25 लाखांपर्यंत जातो. इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम किंवा अन्य कोणत्याही पंपासाठी वेगवेगळा खर्च येतो. त्यासाठी तुम्हाला त्यांच्या वेबसाईटवर जाऊन सगळा तपशील समजून घ्यावा लागेल. प्रत्येक राज्यानुसार व क्षेत्रानुसार पंट्रोल पंप सुरु करण्याची प्रक्रिया वेगवेगळी असते.

काय आहेत अटी
पेट्रोल पंप सुरु करण्यासाठी तुमचे वय 21 ते 60 या दरम्यान असावे लागते. तुमचे शिक्षण किमान दहावी उत्तीर्ण असावे लागते. तुम्ही इयत्ता दहावी उत्तीर्ण नसाल तर तुम्हाला पेट्रोल पंपाच्या डिलरशीपसाठी अर्ज करता येणार नाही. याशिवाय तुम्हाला अनेक परवानग्या व प्रमाणपत्रे काढावी लागतात. या सगळ्यांची माहिती तुम्हाला त्या-त्या कंपनीकडून दिली जाते.
किती कमिशन मिळते
काही अहवालांनुसार, भारतात पेट्रोल पंप सुरु केल्यानंतर पेट्रोलच्या प्रतिलिटरमागे 2 ते 5 रुपये कमिशन मिळते. साधारणतः चांगल्या पेट्रोल पंपावर साधारणः एक हजार लिटर पेट्रोलची विक्री होते. म्हणजेच तुम्ही 20 ते 50 हजार रुपये रोजाप्रमाणे त्यातून कमाई करु शकता. हे कमिशन प्रत्येक कंपनीद्वारे कमी-अधिक प्रमाणात दिले जाते. त्याशिवाय त्या-त्या कंपनीकडून पेट्रोल पंपचालकांना वेगवेगळ्या ऑफर्सही दिल्या जातात. म्हणजे पेट्रोल पंप सुरु करणे अनेकदा फायद्याचेही ठरते.