शेअर मार्केटमधून होणार भरघोस कमाई ! ‘या’ 3 शेअर्स मधून मिळणार अल्पकालावधीतच बंपर परतावा, शेअर मार्केट तज्ज्ञांची माहिती

Ahmednagarlive24 office
Published:
Share

Top Shares To Buy : शेअर मार्केटमध्ये लाखोंच्या संख्येने लोक गुंतवणूक करतात. शेअर बाजारात लिस्टेड कंपन्या गुंतवणूकदारांना चांगला परतावाही देतात. पण बाजारातील गुंतवणूक ही जोखीम पूर्ण असते. शेअर बाजारावर जागतिक पातळीवर तसेच देशांतर्गत घडणाऱ्या विविध घटकांचा प्रभाव पाहायला मिळतो. युद्ध, दुष्काळ, महापूर, महामारी, शासनाचे काही निर्णय इत्यादी घटकांचा डायरेक्ट तसेच इनडायरेक्ट परिणाम होतो.

यामुळे शेअर बाजारात कायमच चढ-उतार सुरू असते. दरम्यान या चढउतारात अनेकदा गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळतो तर काही प्रसंगी गुंतवणूकदारांचे नुकसान देखील होते. यामुळे गुंतवणूकदारांना जगात तसेच देशांतर्गत घडणाऱ्या घडामोडींवर विशेष बारीक लक्ष ठेवावे लागते.

दरम्यान शेअर बाजारातील काही तज्ञांनी गुंतवणूकदारांना अशा तीन स्टॉक्स संदर्भात सुचवले आहे जे स्टॉक्स येत्या काही महिन्यांच्या कालावधीत चांगला परतावा देणार आहेत. शेअर बाजार तज्ञ प्रितेश मेहता यांनी अशा तीन शेअर्समध्ये Invest करण्याचा सल्ला दिला आहे जे अल्पकालावधीत गुंतवणूकदारांना चांगला परतावा देऊ शकणार आहेत.

कोणते आहेत ते स्टॉक

वोल्टास : शेअर बाजार तज्ज्ञ प्रितेश मेहता यांनी वोल्टास यां कंपनीच्या शेअर्सवर विश्वास दाखवला आहे. खरे तर सध्या हा स्टॉक बॉम्बे स्टॉक एक्सचेंज वर 855 रुपयांच्या आसपास ट्रेड करत आहे. मात्र आगामी काळात यामध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. या स्टॉक ची किंमत आगामी काळात 937 रुपयांपर्यंत जाऊ शकते असा अंदाज मेहता यांनी व्यक्त केला आहे. तथापि ब्रोकरेजने यासाठी 832 रुपयांचा स्टॉप लॉस दिला आहे.

निश्चितचं जर तज्ञांनी व्यक्त केलेला अंदाज खरा ठरला तर या शेअरमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळण्याची शक्यता आहे.

झायडस लाइफ : शेअर बाजार तज्ज्ञ प्रितेश मेहता यांनी झायडस लाइफ या कंपनीच्या शेअर्सवर देखील विश्वास दाखवला आहे. त्यांनी यां स्टॉकला बाय रेटिंग दिली आहे. म्हणजेच हा स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे. सध्या हा स्टॉक बॉम्बे स्टॉक एक्सचेंज वर 639 रुपयांच्या आसपास ट्रेड करत आहे. पण लवकरच या शेअरमध्ये तेजी येईल आणि या शेअरचे भाव 709 रुपयांपर्यंत पोहोचतील असा अंदाज आहे. मात्र ब्रोकरेजने या स्टॉकला 634 रुपयांचा स्टॉपलॉस दिला आहे. अर्थातच हा स्टॉक 634 पेक्षा खाली आला तर गुंतवणूकदारांना हे शेअर विकण्यास सांगितले गेले आहे.

युबीएल : प्रितेश मेहता यांनी युबीएल कंपनीच्या शेअर्सवर सुद्धा विश्वास दाखवला असून आगामी काळात या शेअर्समधून चांगली कमाई होईल असा त्यांचा अंदाज आहे. त्यांनी या स्टॉकला बाय रेटिंग दिली आहे. सध्या हा शेअर बॉम्बे स्टॉक एक्सचेंज वर १७२३ रुपयांच्या आसपास ट्रेड करत आहे. यामध्ये लवकरच तेजी येईल आणि हा स्टॉक 1826 रुपये प्रति स्टॉकपर्यंत वाढेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मात्र या स्टॉकला 1670 रुपयांचा स्टॉप लॉस लावायचा आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe