ICICI Bank FD Rate : गेल्या काही वर्षांमध्ये एफडी मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. महिलावर्ग देखील आता मोठ्या प्रमाणात फिक्स डिपॉझिट मध्ये गुंतवणूक करत आहे. याचे कारण म्हणजे अलीकडे राष्ट्रीयकृत बँकांनी तसेच छोट्या स्मॉल फायनान्स बँकांनी एफडीचे व्याजदर मोठ्या प्रमाणात वाढवले आहेत.
अशातच, येत्या काही दिवसांनी फिक्स डिपॉझिट मध्ये गुंतवणूक करू इच्छिणाऱ्यांसाठी एक गुड न्यूज समोर आली आहे. देशातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी प्रायव्हेट बँक अर्थातच आयसीआयसीआय बँकेने आपले एफडी चे व्याजदर रिवाईज केले आहेत.
हे सुधारित व्याजदर आजपासून अर्थातच दोन सप्टेंबर 2024 पासून लागू देखील झाले आहेत. तीन कोटी रुपयांपर्यंतच्या एफडी साठीचे व्याजदर बँकेने सुधारित केले आहेत. यामुळे जर तुम्हीही आयसीआयसीआय बँकेत एफडी केली तर तुम्हाला आता अधिकचा परतावा मिळू शकणार आहे.
ही बँक 15 महिने ते 18 महिन्यांपेक्षा कमी कालावधीच्या एफडीवर सर्वाधिक व्याज देते. दरम्यान आता आपण आयसीआयसीआय बँकेचे एफ डी चे सुधारित व्याजदर थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कसे आहेत बँकेचे सुधारित व्याजदर?
7 ते 29 दिवस : या कालावधीच्या एफडीवर आयसीआयसीआय बँकेच्या माध्यमातून सामान्य ग्राहकांना तीन टक्के आणि ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना 3.50% एवढे व्याजदर दिले जात आहे.
30 ते 45 दिवस : या कालावधीच्या एफडीवर सामान्य ग्राहकांना 3.50% आणि ज्येष्ठ नागरिकांना 4% या दराने व्याज दिले जात आहे.
४६ ते ६० दिवस : सामान्य लोकांसाठी – ४.२५ टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 4.75 टक्के
61 ते 90 दिवस : सामान्य लोकांसाठी – 4.50 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – ५.०० टक्के
91 ते 184 दिवस : सामान्य लोकांसाठी – 4.75 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – ५.२५ टक्के
185 ते 270 दिवस : सामान्य ग्राहकांसाठी – 5.75 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – ६.२५ टक्के
271 दिवसांपासून ते 1 वर्षापेक्षा कमी : सामान्य ग्राहकांसाठी – 6.00 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी 6.50 टक्के
एक वर्ष ते 15 महिन्यांपेक्षा कमी : सामान्य ग्राहकांसाठी – 6.70 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 7.20 टक्के
15 महिने ते 18 महिन्यांपेक्षा कमी : सामान्य लोकांसाठी 7.25 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी 7.80 टक्के
18 महिने ते 2 वर्षे : सामान्य लोकांसाठी – 7.25 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 7.75 टक्के
2 वर्षे 1 दिवस ते 5 वर्षे : सामान्य ग्राहकांसाठी 7.00 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 7.50 टक्के
5 वर्षे 1 दिवस ते 10 वर्षे : सामान्य लोकांसाठी – 6.90 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी 7.40 टक्के
5 वर्षांची कर बचत FD: सामान्य ग्राहकांसाठी 7 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 7.50 टक्के.