FD केली असेल तर दरमहा तुमच्या तुमच्या खात्यावर पैसे यायला होईल सुरवात, जाणून घ्या ‘ही’ माहिती

बरेच लोक मुदत ठेवींमध्ये अर्थात एफडीमध्ये पैसे गुंतवतात आणि मुदतपूर्तीनंतर त्यांना मूळ रकमेवर व्याज जोडून पैसे मिळतात. हा एक सिक्युअर गुंतवणुकीचा प्रकार आहे.

पण तुम्हाला माहित आहे का की तुम्ही फिक्स डिपॉझिटमधूनही तुम्ही दरमहा कमाई करू शकता. स्टेट बँक ऑफ इंडियासह अनेक मोठ्या बँका फिक्स्ड डिपॉझिट मंथली इनकम स्‍कीम सुविधा देत आहेत. जर तुम्ही तुमच्या आवश्यक खर्चाची पूर्तता करण्याचा किंवा ठेवलेल्या पैशांवर अतिरिक्त उत्पन्न मिळविण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही मंथली फिक्‍स्‍ड डिपॉजिट इनकम किंवा मासिक व्याज पेआउट FD चा पर्याय निवडू शकता.

मंथली इंटरेस्ट पेआउट एफडी- एफडीमध्ये दोन पर्याय आहेत. पहिला पर्याय म्हणजे कम्युलेटिव स्कीम, यात मॅच्युरिटी झाल्यावर मुद्दल आणि व्याज दोन्ही जोडून रक्कम दिली जाते. नॉन कम्युलेटिव स्कीम मध्ये ठराविक अंतराने पैसे दिले जातात. एफडीसाठी अर्ज करताना मासिक, त्रैमासिक, सहामाही आणि वार्षिक देयकांचा पर्याय निवडू शकता. मंथली ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर दर महिन्याला खात्यात व्याजाची रक्कम येते.

 एफडी मंथली इनकम : काय आहे विशेष
– एफडी मंथली इनकम स्कीममध्ये जास्तीत जास्त कितीही रक्कम जमा करता येते.
– काही बँका 10 वर्षांच्या दीर्घ कालावधीसाठी ही सुविधा देतात.
– ही योजना इतर मासिक उत्पन्न योजनांपेक्षा अधिक तरलता प्रदान करते. गुंतवणूकदार आपल्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी विहित औपचारिकता पूर्ण करून केव्हाही आपली रोकड काढू शकतो.
-ही योजना सुरू करण्यासाठी कोणतेही प्रोसेसिंग शुल्क नाही.
-बाजारातील चढउतार असूनही, गुंतवणूकदारांना निश्चित व्याजानुसार मासिक परतावा मिळतो, याचा अर्थ ते पूर्णपणे सुरक्षित आहे.
-फिक्स्ड डिपॉझिट मासिक उत्पन्न योजनेमध्ये बँक नॉमिनेशन सुविधा प्रदान करतात.
-फिक्स्ड डिपॉझिट मासिक उत्पन्न योजनेवर कर्ज सुविधा देखील उपलब्ध आहे. गुंतवणूकदार त्यांच्या ठेवींवर कर्ज घेऊ शकतात.

ज्येष्ठ नागरिकांसाठी उत्तम पर्याय-फिक्‍स्‍ड डिपॉजिट मंथली इनकम हा पर्याय ज्येष्ठ नागरिकांसाठी एक चांगला पर्याय आहे . ते त्यांच्या ठेवींवर मासिक उत्पन्न मिळवू शकतात. ज्येष्ठ नागरिकांना FD वर सामान्य FD पेक्षा 50 बेसिस पॉइंट अधिक व्याज मिळते.

यामध्ये, एका वर्षाला मिळणारे व्याज 12 महिन्यांत विभागले जाते आणि दर महिन्याला खात्यात पाठवले जाते. साधारणपणे नॉन-क्युम्युलेटिव्ह स्कीम 12 महिने ते 60 महिन्यांसाठी असतात. मॅच्युरिटी कालावधी संपल्यानंतर, तुम्हाला मूळ रक्कम परत मिळते.

टॅक्सचा नियम काय सांगतो – जर तुम्ही टॅक्स सेव्हिंग फिक्स्ड डिपॉझिट अकाउंटमध्ये गुंतवणूक केली तर तुम्हाला आयकर कायद्याच्या कलम 80 सी अंतर्गत एका आर्थिक वर्षात 1,50,000 रुपयांपर्यंतच्या रकमेवर करसवलत मिळू शकते.

जर एखाद्या आर्थिक वर्षाचे मासिक उत्पन्न किंवा परतावा 40000 रुपयांपेक्षा जास्त असेल तर बँक 10% टीडीएस कापते. ज्येष्ठ नागरिकांच्या बाबतीत ही रक्कम 50 हजार रुपये आहे. जर ठेवीदाराकडे पॅनकार्ड नसेल तर बँक 20% टीडीएस कापणार आहे.