31 March Deadline : 31 मार्चपर्यंत ‘ही’ कामे पूर्ण कराच; नाहीतर होऊ शकते नुकसान, वाचा…

Ahmednagarlive24 office
Published:
31 March Deadline

31 March Deadline : मार्च महिना काही दिवसांनी संपणार आहे. अशातच तुम्हाला पुढील 10 दिवसांत काही महत्त्वाची कामे पूर्ण करायची आहेत. तुम्ही ही कामे पूर्ण केली नाही तर तुम्हाला मोठ्या नुकसानीला समोरे जावे लागू शकते.

यामध्ये फास्टॅग केवायसी, अपडेटेड आयटीआर, टीडीएस फाइलिंग, जीएसटी कंपोझिशनसाठी अर्ज करण्यासाठी अशी आवश्यक काम आहेत. जी तुम्हाला करायची आहेत. जर तुम्ही ही कामं वेळेत पूर्ण केली नाही तर तुम्ही अडचणीत सापडू शकता.

फास्टॅग वापरकर्त्यांसाठी 31 मार्च महत्वाची तारीख आहे. NHAI ने Fastag चे KYC अपडेट करण्याची मर्यादा वाढवली आहे. यापूर्वी हे काम करण्याची शेवटची तारीख 29फेब्रुवारी होती. जी 31 मार्चपर्यंत वाढवण्यात आली आहे.

तुमच्या फास्टॅग कंपनीनुसार, तुम्ही नॅशनल इलेक्ट्रॉनिक टोल कलेक्शनच्या वेबसाइटवर किंवा इंडियन हायवेज मॅनेजमेंट कंपनी लिमिटेडच्या पोर्टलला भेट देऊन तुमच्या फास्टॅगचे केवायसी तपशील अपडेट करू शकता. तसे न केल्यास 1 एप्रिलपासून तुमचे फास्टॅग खाते अवैध होईल.

एप्रिलपासून इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यास सुरुवात होईल. तुम्ही या आर्थिक वर्ष 2023-2024 साठी जुन्या कर योजनेत रिटर्न भरत असाल तर तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीवर कर सूट मिळू शकते. जर तुम्ही यापूर्वी कर बचत योजनांमध्ये गुंतवणूक केली नसेल, तर तुम्ही 31 मार्चपूर्वी त्यामध्ये गुंतवणूक करून आयकर वाचवू शकता.

जर तुम्ही PPF आणि SSY सह अशा इतर सरकारी योजनांमध्ये गुंतवणूक केली असेल, तर तुम्हाला प्रत्येक आर्थिक वर्षात त्या खात्यात किमान रक्कम जमा करणे आवश्यक आहे.

तुम्हाला PPF योजनेत वर्षभरात किमान 500 रुपये आणि SSY योजनेत 250 रुपये गुंतवणे आवश्यक आहे. तुम्ही असे न केल्यास, तुमचे खाते डीफॉल्ट घोषित केले जाऊ शकते आणि तुम्हाला दंड भरावा लागू शकतो.

प्राप्तिकरदात्यांना जानेवारीसाठी विविध कलमांतर्गत मिळणाऱ्या कर सवलतीसाठी TDSH दाखल करण्याचे प्रमाणपत्र सादर करावे लागेल. जर तुमचा कर कापला गेला असेल, तर तुम्हाला ३० मार्चपूर्वी चालान विवरण दाखल करावे लागेल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe