स्वतःची प्राॅपर्टी असावी, असे सगळ्यांनाच वाटते. पण आात प्राँपर्टी खरेदी करताना काही गोष्टी ध्यानात ठेवल्या तर, तुमची लाखोंची बचत होणार आहे. खरेदी केलेली प्राॅपर्टी तुम्ही तुमच्या नावावर घेण्यापेक्षा तुमच्या बायकोच्या नावावर घेतली, तर फायदाच फायदा होणार आहे. घर खरेदी करताना तुमच्या पत्नीचे नाव लिहिण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे मालमत्तेचे मूल्य १% ते २% कमी होऊ शकते. ज्यामुळे स्टॅम्प ड्युटी आणि कर कमी होतो. सामाजिक प्रयत्नांचा एक भाग म्हणून, अनेक राज्य सरकारे महिला खरेदीदारांना स्टॅम्प ड्युटीवर सूट देतात.
कोणते होतात फायदे?
– पत्नीच्या नावावर मालमत्ता खरेदी करणाऱ्या पतींसाठी आयकर लाभ
– पत्नी सह-मालक म्हणून मालमत्ता खरेदी करण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे कलम 80C अंतर्गत कर कपात.
– गृहकर्जाच्या मूळ परतफेडीवर दर आर्थिक वर्षात ₹१.५ लाखांपर्यंतची वजावट मिळू शकते.
– जर तुम्ही दोघेही एकाच मालमत्तेचे सह-मालक असाल आणि तुमच्या पत्नीचे उत्पन्नाचे वेगळे स्रोत असेल तर तुम्ही आणि तुमची पत्नी दोघेही या लाभाचा दावा करू शकता.
– जर खरेदी केलेली मालमत्ता भाड्याने दिली असेल तर तुम्ही आणि तुमची पत्नी दोघेही घर कर्जावर भरलेल्या व्याजाची संपूर्ण रक्कम कापू शकता.
– जर तुमच्या गृहकर्जाची मालमत्ता स्वतःची असेल तर तुम्ही दोघेही त्यावर व्याज देयकांसाठी ₹२ लाखांपर्यंतची वजावट मागू शकता.
– पतीने पत्नीच्या नावावर खरेदी केलेल्या मालमत्तेवरील करांचे फायदे त्यांच्या मालकीच्या हिस्सेदारीनुसार बदलतील.

व्याजदर कमी होतो
तुम्ही तुमच्या पत्नीच्या नावाने गृहकर्ज घेतले, तर बँका आणि वित्तीय संस्था व्याजदरात प्रतिवर्षी १% पर्यंत कपात करू शकतात. या कपातीची रक्कम प्रत्येक बँकेची वेगवेगळी असते. यासाठी तुम्ही ज्या बँकेचे कर्ज घेतले त्या बँकेला याबाबत विचारावे लागेल. दिला आहे.
मुद्रांक शुल्क कमी होते
भारतात विविध राज्ये महिलांनी त्यांच्या नावाने घर खरेदी केल्यास त्यांच्या मुद्रांक शुल्कात 3% पर्यंत कपात करतात. महाराष्ट्रातही अशी सोय करण्यात आलेली आहे. महाराष्ट्रात मालमत्ता विक्रीच्या किंमतीत पुरुषांना 6 टक्के तर महिलांना 5 टक्के मुद्रांक शुल्क भरावे लागते.