Post Office Saving Schemes : पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेत गुंतवणूक केली तर चमकेल तुमचे नशीब, योजनेविषयी वाचा सविस्तर…

Content Team
Published:
Post Office Saving Schemes

Post Office Saving Schemes : अनेकदा लोक आपल्या भविष्याबद्दल खूप चिंतेत असतात. म्हणूनच भविष्यात येणाऱ्या आर्थिक अडचणींचा सामना करण्यासाठी गुंतवणुकीकडे वळतात. पण अनेकवेळा लोक आपले पैसे अशा ठिकाणी गुंतवणे पसंत करतात जिथे त्यांचे पैसे सुरक्षित राहतील. आज आम्ही अशाच एका सुरक्षित गुंतवणूक योजनेबद्दल सांगणार आहोत, चला तर मग…

खरं तर, या योजनेत तुम्हाला सुरक्षेसह चांगला परतावा देखील मिळतो. आम्ही पोस्टाच्या एनपीएस ( नेशनल पेंशन स्कीम) योजनेबद्दल बोलत आहोत. या योजनेत तुम्ही 5 वर्षांसाठी गुंतवणूक करू शकता. याशिवाय या योजनेवर तुम्हाला आयकरात सूट देखील मिळते. या योजनेंतर्गत, गुंतवणूकदार आपले खाते दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर देखील हस्तांतरित करू शकतो. चला याबद्दल सविस्तर जाणून घेऊया…

पोस्ट ऑफिसच्या अधिकृत वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, कोणतीही व्यक्ती एनपीएस अंतर्गत खाते उघडू शकते किंवा दोन ते तीन लोक संयुक्त खाते उघडू शकतात. याशिवाय 18 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्यांसाठी त्यांचे पालक खाते उघडू शकतात. तर 10 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या अल्पवयीन व्यक्तीच्या नावावर खाते उघडण्याची सुविधा देण्यात आली आहे.

NPS योजनेत जमा करावयाची किमान रक्कम 1000 आहे. तर 100 रुपयांच्या पटीत तुम्हाला हवे तितके पैसे जमा करू शकता. आयकर कलम 80C अंतर्गत जमा केलेल्या रकमेवरही सूट दिली जाते. तुमची NSC मध्ये जमा केलेली रक्कम ठेवीच्या तारखेपासून 5 वर्षांनी कालबाह्य होईल.

पोस्ट ऑफिस एनपीएस योजनेवर वार्षिक 7.7 टक्के व्याज मिळते. या व्याजावर दरवर्षी चक्रवाढ व्याजही मिळते. पण तो गुंतवणुकीचा कालावधी पूर्ण झाल्यावर दिला जातो.

तुम्ही स्मॉल सेव्हिंग्ज स्कीम अंतर्गत 5 वर्षांसाठी 10,000 रुपये गुंतवल्यास, ठेव परिपक्व झाल्यावर तुम्हाला 14,490 रुपये मिळतील. यामध्ये तुमची मूळ रक्कम 10 हजार रुपये असेल. तर 4490 रुपये परतावा म्हणून दिला जाईल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe