सध्या अनेकांकडे स्मार्टफोन आहेत. रिलायन्स जिओ आणि एअरटेल या देशातील पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकाच्या दूरसंचार कंपन्या आहेत. जिओचे सध्या सुमारे ४६ कोटी वापरकर्ते आहेत. तर एअरटेलचे सुमारे ३८ कोटी वापरकर्ते आहेत. दोन्ही कंपन्या एकमेकांशी स्पर्धा करण्यासाठी एकापेक्षा एक चांगले रिचार्ज प्लॅन देतात. गेल्या काही काळात जिओ आणि एअरटेलने त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये अनेक मोठे बदल केले. आता दोन्ही कंपन्यांकडे दीर्घ वैधतेसह मजबूत योजना आहेत.
जीओ-एअरटेलने प्लॅन बदलले
तुम्ही एअरटेल किंवा रिलायन्स जिओ सिम वापरत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. जिओ आणि एअरटेल रिचार्ज प्लॅनच्या यादीत असे काही प्लॅन आहेत जे तुमचे संपूर्ण वर्षाचे टेन्शन संपवू शकतात. सोप्या भाषेत सांगायचे, तर दोन्ही कंपन्या असे प्लॅन देतात की जर तुम्ही ते आज खरेदी केले तर तुम्हाला २०२६ मध्ये ते रिचार्ज करावे लागतील.

एअरटेलचा स्वस्त वार्षिक प्लॅन
तुम्ही एअरटेलचे वापरकर्ते असाल तर, तुम्ही दीर्घ वैधतेसह येणारे हे स्वस्त प्लॅन घेऊ शकता. एअरटेलचा १८४९ रुपयांचा प्लॅन खरेदी करू शकता. ज्यांना डेटाची आवश्यकता नाही, त्यांच्यासाठी हा रिचार्ज प्लॅन सर्वोत्तम आहे. या योजनेत ग्राहकांना एक पूर्ण वर्ष म्हणजेच ३६५ दिवसांची दीर्घ वैधता मिळते. या प्लॅनमध्ये सर्व नेटवर्कसाठी अमर्यादित कॉलिंगची सुविधा दिली जात आहे. यासोबतच, एका वर्षासाठी प्लॅनमध्ये ३६०० एसएमएस देखील दिले जात आहेत.
जिओचा स्वस्त प्लॅन
तुम्ही जिओ सिम वापरत असाल, तर आता तुम्ही संपूर्ण वर्षभर रिचार्जच्या त्रासापासून मुक्त होऊ शकता. कंपनीने यादीत १७४८ रुपयांचा परवडणारा प्लॅन सादर केला आहे. जिओच्या या स्वस्त वार्षिक योजनेमुळे कोट्यवधी ग्राहकांचे मोठे टेन्शन संपले आहे. जर तुम्हाला इंटरनेट डेटाची आवश्यकता नसेल तर तुम्ही जिओच्या या रिचार्ज प्लॅनचा वापर करू शकता.
वर्षभर मिळेल वैधता
या प्लॅनमध्ये कंपनी ग्राहकांना ३३६ दिवसांची दीर्घ वैधता देत आहे. म्हणजेच, जर तुम्ही आजच प्लॅन खरेदी केला तर तुम्हाला २०२६ मध्ये थेट तुमचा मोबाईल रिचार्ज करावा लागेल. जिओ प्लॅनमध्ये ३३६ दिवसांसाठी ३६०० मोफत एसएमएस देत आहे. यासोबतच, रिचार्ज प्लॅनमध्ये जिओ टीव्ही आणि जिओ क्लाउडची सुविधा देखील उपलब्ध असेल.