बँक ऑफ बडोदाकडून 30 लाखाचे होम लोन घेतले तर कितीचा हप्ता भरावा लागणार ? वाचा संपूर्ण गणित

Ahmednagarlive24 office
Published:
Bank Of Baroda Home Loan

Bank Of Baroda Home Loan : अलीकडे घरांच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. यामुळे अनेकजण घर खरेदीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कर्ज काढण्याचा विचार करतात.

प्रत्येकाचे एक स्वतःचे हक्काचे घर असावे जिथे आपले उर्वरित आयुष्य मनमुरादपणे जगता यावे असे स्वप्न असते. यासाठी प्रत्येकजण अहोरात्र कष्ट घेत असतो. मात्र असे असले तरी घरासाठी कर्ज काढावाच लागत. दरम्यान जर तुम्हीही गृह कर्ज घेण्याच्या तयारीत असाल तर बँक ऑफ बडोदाकडून गृह कर्ज घेणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते.

बँक ऑफ बडोदा आपल्या ग्राहकांना कमी व्याजदरात होम लोन उपलब्ध करून देत आहे. यामुळे आज आपण जर बँक ऑफ बडोदा कडून 30 लाख रुपयांचे होम लोन घेतले तर किती रुपयांचा हप्ता भरावा लागू शकतो याविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहोत. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया याविषयी सविस्तर.

बँक ऑफ बडोदाचे गृहकर्जासाठीचे व्याजदर

बँक ऑफ बडोदा ही देशातील 12 सार्वजनिक क्षेत्रातील बँकांपैकी एक आहे. ही एक प्रमुख पब्लिक सेक्टर बँक म्हणजेच पी एस बी आहे. बँकेच्या माध्यमातून आपल्या ग्राहकांना कमी व्याज दरात होम लोन पुरवले जात आहे. ही बँक किमान 8.40% व्याजदरात होम लोन उपलब्ध करून देते.

जास्त सिबिल असेल तर कमी व्याजदरात होम लोन

ज्या ग्राहकांचा सिबिल स्कोर चांगला असतो त्यांना बँक ऑफ बडोदा कमी व्याज दरात होम लोन देते. सिबिल स्कोर हा 300 ते 900 दरम्यान गणला जातो. यातील 750 पेक्षा जास्तीचा सिबिल स्कोर हा चांगला मानला जातो. तसेच जर सिबिल स्कोर 800 च्या जवळपास असेल तर खूपच चांगले समजले जाते.

सिबिल स्कोर हा ग्राहकांची क्रेडिट हिस्ट्री दर्शवत असतो. त्यामुळे सिबिल स्कोर मेंटेन करणे आवश्यक असते. जर ग्राहकांचा सिबिल स्कोर 800 च्या जवळपास असेल तर बँक ऑफ बडोदाकडून 8.40 टक्के या किमान व्याजदरात होम लोन मंजूर करू शकते.

30 लाखाचे होम लोन घेतले तर कितीचा हफ्ता भरावा

जर बँक ऑफ बडोदा कडून एखाद्या कस्टमरला 30 लाख रुपयांचे होम लोन 15 वर्षाच्या कालावधीसाठी मंजूर झाले तर त्याला 29 हजार 367 रुपयांचा हफ्ता भरावा लागणार आहे.

पण जर ग्राहकाला 8.40% या किमान व्याजदरात कर्ज मंजूर झाले तर एवढा हफ्ता द्यावा लागणार आहे. जर व्याजदर यापेक्षा अधिक लावले गेले असेल तर साहजिकच मासिक हप्ता देखील वाढणार आहे.

म्हणजेच सदर ग्राहकाला संपूर्ण कर्ज खेळताना 22 लाख 85 हजार 988 रुपये एवढे व्याज भरावे लागणार आहे. म्हणजेच मूळ रक्कम आणि व्याज रक्कम असे एकूण 52 लाख 85 हजार 988 रुपये एवढे पैसे सदर ग्राहकाला भरावे लागणार आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe