LIC Policy : दरमहा 20 हजार रुपये पेन्शन हवी असेल तर LIC च्या ‘या’ पॉलिसीमध्ये करा गुंतवणूक!

Ahmednagarlive24 office
Published:
LIC Policy

LIC Policy : LIC ही देशातील सर्वात मोठी विमा कंपनी आहे. एलआयसी विविध उत्पन्न गटांना लक्षात घेऊन देशात अनेक उत्तम योजना चालवत आहे. LIC कडे सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय म्हणून पाहिजे जाते. म्हणूनच मोठ्या प्रमाणात लोकं एलआयसीच्या विविध योजनांमध्ये गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात.

LIC कडे एकापेक्षा एक योजना आहेत ज्यात तुम्ही गुंतवणूक करून चांगला परतावा कमावू शकता. अशातच जर तुम्ही एक चांगली पेन्शन योजना शोधत असाल तर तुम्ही LIC च्या जीवन अक्षय पॉलिसीमध्ये गुंतवणूक करू शकता. ही एक अद्भुत योजना आहे जी तुमचे भविष्य सुरक्षित करते.

या योजनेत गुंतवणूक केल्यानंतर तुम्हाला आयुष्यभर पेन्शनचा लाभ मिळतो. तुम्हाला एलआयसीच्या जीवन अक्षय पॉलिसीमध्ये फक्त एकदाच गुंतवणूक करावी लागेल. त्यानंतर तुम्हाला आयुष्यभर पेन्शनचा लाभ मिळत राहील. तुम्हाला एलआयसीच्या जीवन अक्षय पॉलिसीमध्ये कोणत्याही प्रकारचे मासिक प्रीमियम भरण्याची गरज नाही.

एलआयसीची ही योजना तुम्ही ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही खरेदी करू शकता. 30 ते 85 वर्षे वयोगटातील लोक या योजनेत गुंतवणूक करू शकतात.
तुम्ही LIC च्या जीवन अक्षय पॉलिसीमध्ये 40,72,000 रुपयांची एकरकमी गुंतवणूक केल्यास तुम्हाला दरमहा सुमारे 20 हजार रुपये मासिक पेन्शनचा लाभ मिळेल.

एलआयसीची ही योजना एकल आणि संयुक्त विमा पॉलिसींसाठी दहा वर्षांसाठी उपलब्ध आहे. याशिवाय एलआयसीच्या या योजनेत तुम्हाला अनेक फायदेही मिळतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe