Top 5 Shares : पैसे दुप्पट करायचे असतील तर ‘या’ शेअर्समध्ये करा गुंतवणूक, एका महिन्यातच व्हाल श्रीमंत!

Ahmednagarlive24 office
Published:
Top 5 Shares

Top 5 Shares : शेअर मार्केटमध्ये सध्या मोठ्या प्रमाणावर उलाढाल घडत असते. एक मोठा वर्ग आहे जो यामध्ये विविध प्रकारे गुंतवणूक करत असतो, त्यातून मोठ्या प्रमाणात लाभ देखील मिळवत असतो, आजची ही बातमी खास त्यांच्यासाठीच आहे जे शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात, आज आपण अशा टॉप 5 शेअर्स बद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांनी गेल्या काही काळापासून आपल्या गुंतवणूकदारांना श्रीमंत केले आहे. 

टॉप 5 शेअर्स

-वल्लभ स्टीलचा शेअर महिन्याभरापूर्वी 7.50 रुपये होता. आता या शेअरचा दर 18.91 रुपये आहे. अशा प्रकारे या शेअरने एका महिन्यात सुमारे 152.13 टक्के परतावा दिला आहे. या शेअरने एका महिन्यात 1 लाख रुपयांचे रूपांतर 2.52 लाख रुपयांमध्ये केले आहे. म्हणजे एका महिन्यात या शेअरने दुप्पट परतावा दिला आहे.

-दुसरा शेअर म्हणजे तिजारिया पॉलीपाइप्सचा शेअर गेल्या महिन्यात हा शेअर 6.10 रुपये होता. आता या शेअरचा दर 14.82 रुपये आहे. अशाप्रकारे या शेअरने एका महिन्यात सुमारे 142.95 टक्के परतावा दिला आहे. या शेअरने एका महिन्यात 1 लाख रुपयांचे 2.43 लाख रुपयांमध्ये रूपांतर केले आहे. या शेअरने एका महिन्यातच आपल्या ग्राहकांना तिप्पट परतावा दिला आहे.

-निलाचल रिफ्रॅक्टरचा शेअर देखील आपल्या गुंतवणूकदारांना उत्तम परतावा देत आहे. गेल्या महिन्यात हा शेअर 41.50 रुपयांना होता. आता या शेअरचा दर 101.67 रुपये झाला आहे. अशाप्रकारे या स्टॉकने एका महिन्यात सुमारे 144.99 टक्के परतावा दिला आहे. या शेअरने एका महिन्यात गुंतवणूकदारांचे 1 लाख रुपयांचे 2.45 लाख रुपयांमध्ये रूपांतर केले आहे.

-सरस कमर्शिअलचा शेअर महिन्याभरापूर्वी 3,238.05 रुपये होता. आता या शेअरचा दर 7,643.40 रुपये झाला आहे. अशा प्रकारे या शेअरने एका महिन्यात सुमारे 136.05 टक्के परतावा दिला आहे. या शेअरने एका महिन्यात 1 लाख रुपयांचे 2.36 लाख रुपयांमध्ये रूपांतर केले आहे.

-प्रिसिजन इलेक्टचा शेअर दर महिन्यापूर्वी 66.19 रुपये होता. आता या शेअरचा दर 156.10 रुपये झाला आहे. अशा प्रकारे या शेअरने एका महिन्यात सुमारे 135.84 टक्के परतावा दिला आहे. एका महिन्यात या शेअरने 1 लाख रुपयाचे 2.35 लाख रुपये केले आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe