March Bank Holiday : बँक ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी ! ‘या’ दिवशी बंद राहणार देशातील बँका…

March Bank Holiday : जर तुम्ही या महिन्यात बँकेशी संबंधित काही काम करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. मार्च महिन्यात काही दिवस बँका बंद राहणार आहेत, अशास्थितीत तुम्हाला तुमचे काम करता येणार नाही, किंवा माहिती अभावी तुम्ही बँकेला चकरा मारत राहाल. मार्च महिन्यात किती दिवस बँका बंद राहणार आहेत पुढीलप्रमाणे :-

मार्च महिन्यात 8 ते 25 तारखे दरम्यान बँका 7-8 दिवस बंद राहणार आहेत. यामध्ये महाशिवरात्री, होळी आणि शनिवार, रविवारसह विविध राज्यांतील अनेक सणांच्या सुट्ट्यांचा समावेश आहे. बँका सतत बंद असल्याने चेकबुक, पासबुकसह अनेक कामांवर परिणाम होऊ शकतो. मात्र, ऑनलाइन सेवा सुरूच राहतील.

मार्च 2024 मध्ये बँकेला सुट्ट्या कधी असतील?

09 मार्च 2024- दुसरा शनिवार

10 मार्च 2024- रविवार

17 मार्च 2024- रविवार

22 मार्च 2024- बिहार दिनानिमित्त पाटण्यात बँका बंद.

23 मार्च 2024- चौथा शनिवार

24 मार्च 2024- रविवार

25 मार्च 2024- होळीमुळे बेंगळुरू, भुवनेश्वर, चेन्नई, इंफाळ, कोची, कोहिमा, पाटणा, श्रीनगर आणि त्रिवेंद्रम वगळता देशभरातील बँका बंद राहतील.

ग्राहकांवर काय परिणाम होईल !

-बँक सुट्ट्यांमध्ये ग्राहक ऑनलाइन सेवा वापरू शकतात, कारण UPI, मोबाईल बँकिंग, इंटरनेट बँकिंग यांसारख्या डिजिटल सेवांवर बँक सुट्ट्यांचा कोणताही परिणाम होत नाही.

-पैसे UPI द्वारे देखील हस्तांतरित केले जाऊ शकतात, तर तुम्ही पैसे काढण्यासाठी ATM वापरू शकता.

-तुम्ही तुमचे काम नेट बँकिंग, एटीएम, डिजिटल पेमेंटद्वारेही करू शकता.

-तुम्ही क्रेडिट आणि डेबिट कार्ड देखील सहज वापरू शकता. तुम्ही नेट बँकिंग किंवा मोबाईल बँकिंगद्वारे एका खात्यातून दुसऱ्या खात्यात पैसे ट्रान्सफर करू शकता.

-RBI बँकेच्या सुट्ट्यांना तीन श्रेणींमध्ये विभागते, ज्यात निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स कायद्यांतर्गत सुट्ट्या, निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स कायद्यांतर्गत सुट्ट्या आणि रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट हॉलिडे आणि बँक क्लोजिंग ऑफ अकाउंट्स यांचा समावेश होतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe