पंजाब नॅशनल बँकेच्या ग्राहकांसाठी महत्वाची बातमी ! 18 डिसेंबरपर्यंत पूर्ण करा ‘हे’ काम; अन्यथा…

Published on -

PNB KYC Updation : तुम्ही पंजाब नॅशनल बँकेचे ग्राहक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. बँकेने ग्राहकांसाठी अलर्ट जारी केला आहे. बँकेने खातेधारकांना हे काम लवकरात लवकर पूर्ण करायला सांगितले आहे. अन्यथा तुमचे खाते बंद होऊ शकते, अशा इशारा देखील बँकेकडून देण्यात आला आहे.

PNB बँकेने आपल्या ग्राहकांना लवकरात लवकर KYC पूर्ण करायला सांगितले आहे. पीएनबीने अधिकृतपणे ग्राहकांना त्यांचे खाते लवकरात लवकर अपडेट करण्यास सांगितले आहे अन्यथा खाते बंद केले जाऊ शकते. आरबीआयच्या मार्गदर्शक सूचना लक्षात घेऊन पीएनबीने हे पाऊल उचलेल आहे.

PNB ने 7 डिसेंबर रोजी एक प्रेस रिलीज जारी केले आहे. या प्रेस रिलीजमध्ये, बँकेने आपल्या ग्राहकांना त्यांचे KYC तपशील लवकरात लवकर अपडेट करण्यास सांगितले आहे. केवायसी अपडेट न केल्यास त्यांचे खाते बंद होऊ शकते. केवायसी अपडेट करण्यासाठी बँकेने ग्राहकांना 18 डिसेंबरपर्यंत वेळ दिला आहे.

केवायसी अपडेट करणे आवश्यक ?

पीएनबीने सांगितले की, आरबीआयच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, सर्व ग्राहकांनी केवायसी अपडेट करणे आवश्यक आहे. जर तुम्ही 30 सप्टेंबर 2023 पर्यंत तुमच्या खात्याचे KYC केले नसेल, तर तुम्ही तुमचे सर्व तपशील 18 डिसेंबर 2023 पर्यंत अपडेट करावेत. खात्याची केवायसी प्रक्रिया पीएनबी वन सेवेद्वारे किंवा पोस्टाद्वारे अपडेट केली जाऊ शकते.

याशिवाय, बँकेच्या ग्राहकाची इच्छा असल्यास, तो पीएनबी शाखेत जाऊन केवायसी अपडेट प्रक्रिया पूर्ण करू शकतो. तुमचे खाते अपडेट न केल्यास तुमचे खाते बंदही होऊ शकते.

केवायसी तपशीलांमध्ये काय अपडेट आहेत?

पीएनबीने सांगितले की, ग्राहकांना केवायसीसाठी ओळखीचा पुरावा, पत्ता पुरावा, नवीनतम फोटो, पॅन, उत्पन्नाचा पुरावा आणि मोबाइल नंबर इत्यादी प्रदान करावे लागतील.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe