गुंतवणूकदारांसाठी महत्वाची बातमी ; ‘हा’ 150 चा स्टॉक पोहचणार 190 रुपयांवर, शेअर बाजारातील तज्ञांनी दिला खरेदीचा सल्ला

Published on -

Share Market Stock To Buy : शेअर बाजारात गुंतवणूक करताय ? मग थांबा, गुंतवणुकीपूर्वी ही बातमी एकदा वाचाच. जसं की आपणास ठाऊकच आहे की नुकताच पाच राज्यांमधील विधानसभा निवडणूकांचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या पाच राज्यांपैकी तीन राज्यांमध्ये भारतीय जनता पार्टीने आपला झेंडा फडकवला आहे. मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान मध्ये बीजेपीने स्पष्ट जनादेश मिळवला आहे.

मात्र, तेलंगानामध्ये काँग्रेसने सत्ता स्थापित केली आहे. तेलंगाना मध्ये काँग्रेसने बीआरएस या पक्षाला धूळ चारत बहुमतचा आकडा पार केला आहे. दरम्यान विधानसभा निवडणूकांचे हे रिझल्ट डिक्लेअर होताच शेअर मार्केटमध्ये अभूतपूर्व तेजी पाहायला मिळत आहे. तज्ञांनी परकीय गुंतवणूकदार परतल्यामुळे शेअर बाजारात विक्रमी तेजी आली असल्याचे निरीक्षण नोंदवले आहे. प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टी आपल्या ऑल टाईम हायवर पोहचले आहे.

या तेजीत बँकिंग क्षेत्रात उत्साहाचे वातावरण आहे. अशातच जागतिक ब्रोकरेज फर्म नोमुराने बँकिंग क्षेत्रातील एक धमाकेदार स्टॉक आगामी काळात चांगली ग्रोथ करणार असल्याचा दावा केला असून या स्टॉकसाठी ब्रोकरेज फर्मने बाय रेटिंग दिली आहे. विशेष बाब म्हणजे हा शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार रेखा झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमध्ये सुद्धा आहे. यामुळे आता निश्चितच तुम्हाला या स्टॉक बाबत जाणून घ्यायचे असेल चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया विषयी सविस्तर.

कोणता आहे तो स्टॉक

नोमुराने खाजगी बँकिंग क्षेत्रातील फेडरल बँकेचे शेअर्सला बाय रेटिंग दिली आहे. म्हणजेच गुंतवणूकदारांना हे शेअर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. या ब्रोकरेज फर्मने असे म्हटले आहे की, फेडरल बँकेचे शेअर्स आगामी काळात 190 रुपयांच्या पातळीवर पोहोचन्याची शक्यता आहे.

काल, अर्थातच 4 डिसेंबर 2023 रोजी बीएसईवर हा शेअर 154 रुपयांवर बंद झाला आहे. म्हणजेच या शेअर्सच्या किंमतीमध्ये आगामी काळात 36 रुपयांपर्यंतची तेजी येणार असा अंदाज आहे. निश्चितचं जर ब्रोकरेज फर्मचा हा अंदाज खरा ठरला तर गुंतवणूकदारांची चांदी होणार आहे यात शंकाच नाही.

फेडरल बँकेची कामगिरी आहे चमकदार

रिपोर्टनुसार, फेडरल बँकेने गेल्या पाच वर्षात आपल्या गुंतवणूकदारांची रक्कम दुप्पट केली आहे. या समभागांनी 5 दिवसातचं सुमारे 5% परतावा दिला आहे. तसेच गेल्या 6 महिन्यांचा विचार केला तर या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना जवळपास 23 टक्के रिटर्न दिले आहेत. अर्थातच गेल्या काही वर्षांमध्ये बँकेने आपल्या गुंतवणूकदारांना चांगला सकारात्मक परतावा दिला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe