Loan Recovery Rule: कर्ज घेतलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर बँक कर्जाची वसुली कशी करते? काय आहे या संबंधीचा नियम?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Loan Recovery Rule:- बरेच जण वेगवेगळ्या कामांकरिता बँक व इतर संस्थांकडून कर्ज घेतात. यामध्ये होम लोन तसेच कार लोन, बिझनेस लोन इत्यादी कर्जांचा समावेश आपल्याला करता येईल. आपल्याला माहित आहेस की घेतलेल्या या कर्जाची परतफेड ही प्रत्येक महिन्याला ठरवून दिलेल्या ईएमआयनुसार आपल्याला करावी लागते.

घेतलेले या कर्ज परतफेडीसाठी एक निश्चित कालावधी बँक किंवा वित्तीय संस्थांच्या माध्यमातून देण्यात येतो. या कालावधी दरम्यान या संपूर्ण कर्जाची परतफेड ईएमआयच्या स्वरूपामध्ये केली जाते. परंतु कधी कधी दुर्दैवाने ज्या व्यक्तीने कर्ज घेतले आहे त्या व्यक्तीचा काही कारणास्तव मृत्यू होतो.जर कर्ज घेतलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर मात्र घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्याची जबाबदारी कोणावर असते किंवा ही कर्जाची थकीत रक्कम बँक नेमकी कुणाकडून वसूल करू शकते?

याबाबत देखील काही बँकांचे नियम आहेत. आपल्याला माहित आहे की जर घेतलेले कर्ज वेळेवर परतफेड केले नाही तर बँक कारवाई करू शकते. त्याच कर्जामध्ये म्हणजे सुरक्षित कर्जामध्ये काही प्रॉपर्टी तारण म्हणून दिलेली असते. त्यामुळे अशी प्रॉपर्टी ताब्यात घेण्याचा अधिकार बँकांना आहे. या अनुषंगाने आपण बँकांचे कर्जदाराचा मृत्यू झाला तर परतफेडीसंबंधीचे काय नियम आहेत ते समजून घेऊ.

 कर्जदाराचा मृत्यू झाला तर बँक कर्ज कसे वसूल करते?

1- पर्सनल लोन जर आपण पर्सनल म्हणजेच वैयक्तिक कर्जाचा विचार केला तर हे एक असुरक्षित प्रकारचे कर्ज आहे. म्हणजेच या प्रकारच्या कर्जामध्ये तुम्ही बँकेकडे काहीही तारण दिले नसते. अशावेळी पर्सनल लोन घेतलेल्या एखाद्या कर्जदाराचा जर मृत्यू झाला तर संबंधित कर्जदाराचे वारसदार किंवा कुटुंबातील इतर सदस्यांकडून त्या कर्जाची थकबाकी वसूल केली जात नाही. अशावेळी बँका अशा प्रकारची कर्ज अनुत्पादक मालमत्ता म्हणून घोषित करते.

2- होमलोन घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर होम लोन घेतले जाते. परंतु काही कारणामुळे जर होमलोन फेडण्याअगोदरच कर्जदाराचा मृत्यू झाला तर  मात्र वारसांकडून थकीत होमलोनची वसुली करण्यात येते. परंतु वारसदार देखील कर्ज फेडायला सक्षम नसतील तर मात्र तारण ठेवलेल्या मालमत्तेतून थकीत रक्कम बँक वसूल करत असते. जर संयुक्तरीत्या म्हणजेच दोन व्यक्ती मिळून जर कर्ज घेतले असेल तर एका व्यक्तीच्या मृत्यूनंतर दुसऱ्या व्यक्तीला ती थकीत रक्कम पूर्ण भरावी लागते.

3- कार लोन बरेच जण वाहन खरेदीसाठी देखील बँकांकडून कर्ज घेतात. समजा एखाद्या व्यक्तीने कार लोन घेतलेले आहे आणि संबंधित व्यक्तीवर थकबाकी बाकी आहे. त्या अगोदरच कर्ज घेतलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर ज्या वाहनासाठी किंवा ज्या गोष्टी करिता कर्ज घेतले गेलेले आहेत ते वाहन किंवा संबंधित वस्तू जप्त करून त्या कारची किंवा वाहनाची विक्री केली जाते व त्या माध्यमातून थकबाकी वसूल केली जाते.

अशाप्रकारे बँक कर्जदाराचा मृत्यू झाला तर कर्ज वसूल करू शकते.