Samsung Galaxy : सॅमसंग हा भारतीय बाजारपेठेतील सर्वाधिक लोकप्रिय फोन आहे. कंपनीच्या M-सीरीजने लोकांना अक्षरशः वेड लावले आहे. अशातच अलीकडेच कपंनीने एक नवीन 5G फोन Samsung Galaxy M15 5G लाँच केला आहे. हा फोन 6000mAh बॅटरीसह येतो, या फोनमध्ये आकर्षक डिझाइनसह शक्तिशाली कॅमेरा सेटअप देखील आहे आणि ॲमेझॉन ग्रेट समर सेलमध्ये हा फोन बंपर सवलतीत खरेदी करण्याची संधी आहे.
ॲमेझॉन सेलमध्ये सॅमसंग स्मार्टफोन खरेदी केल्यावर, ग्राहकांना केवळ मोठी सूट दिली जात नाही तर बँक ऑफरचाही लाभ मिळत आहे, तसेच सोबतच कंपनी अधिकृत चार्जर देखील मोफत भेट म्हणून मिळणार आहे.
कंपनीने या फोनचा बेस व्हेरिएंट 4GB रॅम आणि 128GB स्टोरेजसह आणला आहे आणि त्याची किंमत 13,299 रुपये ठेवण्यात आली आहे. दुसरा 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंट 14,799 रुपयांना लॉन्च करण्यात आला.
आजकाल ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म Amazon वर ग्रेट समर डेज सेल सुरू आहे आणि विशेष सवलतीमुळे, 11,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत हा फोन सूचीबद्ध केला गेला आहे. निवडलेल्या बँक कार्डद्वारे पेमेंट केल्यास, तुम्हाला 1000 रुपयांची सवलत उपलब्ध आहे. अशा प्रकारे फोनची किंमत फक्त 10,999 रुपये आहे.
Galaxy M15 5G सवलतीच्या दरात खरेदी करणाऱ्या ग्राहकांना 1,699 रुपये किमतीचा अधिकृत चार्जर देखील मोफत दिला जात आहे. हे उपकरण स्टोन ग्रे, सेलेस्टियल ब्लू आणि ब्लू टोपाज कलर पर्यायांमध्ये खरेदी केले जाऊ शकते.
Galaxy M15 5G वैशिष्ट्य :-
सॅमसंग फोनमध्ये 90Hz रिफ्रेश रेट सपोर्टसह 6.6-इंचाचा फुल एचडी सुपर AMOLED डिस्प्ले आहे. यात MediaTek Dimensity 6100 प्रोसेसर आणि 6GB पर्यंत LPDDR4X रॅम आहे. फोन Android 14 वर आधारित OneUI 6 सह येतो. मागील पॅनलवर, 50MP मुख्य कॅमेरासह 5MP अल्ट्रा-वाइड कॅमेरा आणि 2MP मॅक्रो सेन्सरसह सेटअप आहे. 13MP सेल्फी कॅमेरा असलेली मोठी 6000mAh बॅटरी 25W चार्जिंग सपोर्टसह येते.