Stock To Buy: शेअर मार्केट गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ज्यांना नव्याने शेअर्स खरेदी करायचे असतील त्यांच्यासाठी ही बातमी खास ठरणार आहे. खरे तर शेअर मार्केटमध्ये गेल्या काही महिन्यांपासून मोठी अनिश्चितता पाहायला मिळत आहे. मागील वर्ष मार्केट साठी फारच निराशा जनक राहिले आहे. गेल्या वर्षात अनेक गुंतवणूकदारांचे नुकसान झाले आहे. शेअर मार्केट मधील बहुतांशी स्टॉक गेल्यावर्षी गुंतवणूकदारांसाठी चिंतेचे ठरलेत आणि त्यातून गुंतवणूकदारांना निगेटिव्ह रिटर्न मिळालेत. मात्र अशा या चढउताराच्या परिस्थितीत सुद्धा काही स्टॉक गुंतवणूकदारांना कमाईची संधी उपलब्ध करून देत आहेत.
दरम्यान आज आपण अशाच एका शेअरची माहिती पाहणार आहोत. ब्रोकरेज हाऊस जेफरीजकडून सौर ऊर्जा कंपनी एमव्ही फोटोव्होल्टेइक पावर साठी बाय रेटिंग देण्यात आली आहे म्हणजेच हा स्टॉक खरेदी करण्याची शिफारस करण्यात आली आहे. सौर ऊर्जेचा वाढता वापर या कंपनीसाठी फायद्याचा ठरणार असा विश्वास जागतिक ब्रोकरेज हाऊस कडून वर्तवण्यात आला आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की या कंपनीचे शेअर्स गेल्या वर्षी लिस्ट झालेत.

नोव्हेंबर 2025 मध्ये या कंपनीचे शेअर लिस्ट झालेत. आयपीओ मध्ये या कंपनीच्या शेअरची किंमत 217 रुपये होती. महत्त्वाची बाब म्हणजे लिस्टिंग नंतर कंपनीचे शेअर्स 248 रुपयांपर्यंत पोहोचले होते. मात्र सध्या या कंपनीचे स्टॉक 198 रुपयांच्या रेंजमध्ये व्यवहार करत आहेत. पण येत्या काळात या स्टॉक मधून गुंतवणूकदारांना 70% पर्यंत रिटर्न मिळू शकतात असा अंदाज आहे. एमव्ही फोटोव्होल्टेइक कंपनीबाबत बोलायचं झालं तर ही सौर ऊर्जा क्षेत्रातील एक आघाडीची कंपनी आहे. ही एक भारतीय कंपनी आहे. या कंपनीच्या माध्यमातून सोलर सेल्स आणि मॉड्यूल्सच उत्पादन केले जात आहे. ही कंपनी प्रामुख्याने उच्च कार्यक्षमतेच्या सौर उपकरणांच्या निर्मितीवर लक्ष केंद्रित करत आहे आणि कंपनीच्या वाढीसाठी सध्या पोषक स्थिती आहे.
काय टार्गेट प्राईस दिली आहे?
जागतिक ब्रोकरेज हाऊसने एमव्ही फोटोव्होल्टेइकच्या शेअरसाठी बाय रेटिंग जाहीर केली आहे. सौर ऊर्जेचे दर हे कोळसा प्रकल्पातून प्राप्त ऊर्जेच्या दरापेक्षा कमी आहेत. यामुळे या कंपनीच्या वाढीसाठी पोषक स्थिती तयार होते. यामुळे दोनशे रुपयांच्या आसपास व्यवहार करणाऱ्या या कंपनीचे शेअर्स 320 रुपयांपर्यंत वाढणार असा अंदाज आहे. अर्थात या कंपनीच्या शेअर्स साठी 320 रुपयांची टार्गेट प्राईज निश्चित करण्यात आली आहे. म्हणजे करंट मार्केट प्राइस पेक्षा गुंतवणूकदारांना 70 टक्के रिटर्न मिळणार असा अंदाज आहे.












