Suzlon Energy Share Price बद्दल Motilal Oswal कडून आला महत्वाचा रिपोर्ट ! टार्गेट ठरलं…

Updated on -

आज शेअर बाजारात लक्ष वेधून घेतलेला रिपोर्ट म्हणजे ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवालचा ‘सेक्टर्स ऑफ द वीक’. या आठवड्यात त्यांनी एनर्जी सेक्टरवर खास भर दिला असून, अक्षय ऊर्जा क्षेत्रातील वाढत्या संधींवर त्यांचा विश्वास दिसून आला.

सरकारकडून मिळणारे प्रोत्साहन, नवनवीन धोरणं आणि वाढत्या मागणीमुळे हा सेक्टर गुंतवणूकदारांसाठी आकर्षक ठरत आहे.गुंतवणुकीच्या जगात अनेकदा एखाद्या क्षेत्रावर पैज लावली जाते, पण पुरेशी माहिती किंवा विश्लेषण नसल्यास हा निर्णय उलटाही पडू शकतो.

मात्र, योग्य संशोधन आणि तज्ञांचा सल्ला घेतल्यास जोखीम कमी करून नफा मिळवण्याची शक्यता वाढते. मोतीलाल ओसवालचा हा रिपोर्ट अशाच गुंतवणूकदारांसाठी मार्गदर्शक ठरू शकतो, जे पुढच्या आठवड्यात चांगला परतावा मिळवण्याच्या शोधात आहेत.

या अहवालात मोतीलाल ओसवालने भारतातील अक्षय ऊर्जा व्यवसायात होत असलेल्या बदलांचा उल्लेख केला आहे. नवीन आणि अक्षय ऊर्जा मंत्रालयाने नुकतेच आदेश दिले आहेत की, 31 जुलै 2025 पासून प्रमुख पवन टर्बाइन घटकांसाठी केवळ मान्यताप्राप्त मॉडेल आणि उत्पादकांचीच यादी ग्राह्य धरली जाईल.

यामुळे देशांतर्गत उत्पादनाला चालना मिळेल, बाजारातील स्पर्धा वाढेल आणि प्रकल्पांच्या दीर्घकालीन व्यवहार्यतेशी संबंधित अडचणी कमी होतील. याच पार्श्वभूमीवर, मोतीलाल ओसवालने या आठवड्याच्या सेक्टरसाठी ‘सुझलॉन एनर्जी लिमिटेड’ची निवड केली आहे.

कंपनीचा दृष्टीकोन सध्या खूप मजबूत आहे. आर्थिक वर्ष 2026 पर्यंत सुमारे 4 गिगावॅटचा ऑर्डर इनफ्लो अपेक्षित आहे, ज्यात एनटीपीसीकडून मिळणारा 1.5 गिगावॅटचा मोठा ऑर्डरही आहे. यामुळे FY26 च्या अखेरीस सुझलॉनचे ऑर्डर बुक सुमारे 6.5 गिगावॅटपर्यंत पोहोचू शकते.

स्थानिक उत्पादनासंदर्भातील मंत्रालयाच्या नव्या आदेशांमुळे, 31 जुलै 2025 नंतर प्रमुख टर्बाइन घटकांचे देशांतर्गत स्रोतीकरण बंधनकारक होणार आहे. सुझलॉनकडे आधीपासूनच एकात्मिक उत्पादन व्यवस्था असल्याने या बदलाचा फायदा कंपनीला होण्याची शक्यता अधिक आहे.

दरम्यान आज सोमवारी सुझलॉन एनर्जीचा शेअर दुपारी 12 वाजता 64.14 रुपयांवर ट्रेंड करतो आहे, तसे टार्गेट प्राईसच्या बाबतीत, मोतीलाल ओसवालने सुझलॉन एनर्जीचा दर ₹82 प्रति शेअर असा निश्चित केला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe