चक्क भारतातील ‘या’ शहरात पेट्रोल मिळतेय ८२ रुपये लिटर

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 04 डिसेंबर 2021 :- गेल्या काही महिन्यानापासून देशात महागाईने डोके वर काढले आहे. दरदिवशी इंधन दार तसेच अन्य गोष्टीत होणारी वाढ पाहता महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे.

यातच एक दिलासादायक माहिती समोर येत आहे. ती म्हणजे देशातील एका शहरात चक्क पेट्रोल ८२ रुपये प्रतिलिटर मिळते आहे.

सर्वत्र शंभरी पार असलेले पेट्रोल एवढ्या कमी दरात मिळणारे शहर आहे पोर्ट ब्लेअर होय… सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल डिझेलचे नवीन दर जाहीर केले आहेत.

नवीन दरानुसार, आज देशाची राजधानी दिल्लीत पेट्रोलचा दर ९५.४१ रुपये प्रति लीटर आहे, तर डिझेल ८६.६७ रुपये प्रति लिटरने विकले जात आहे.

आज शनिवार ४ डिसेंबर रोजी इंधन दरात कोणताही बदल झालेला नाही. दोन दिवसांपूर्वी दिल्लीच्या केजरीवाल सरकारने पेट्रोलवरील व्हॅट कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.

या निर्णयानंतर दिल्लीत एक लिटर पेट्रोल आठ रुपयांनी स्वस्त झाले आहे. दिल्लीत एक लिटर पेट्रोलची किंमत १०३.९३ रुपयांवरून ९५.४१ रुपयांवर आली आहे.

शहारनिहाय पेट्रोल दर (लिटरमध्ये)

दिल्लीत पेट्रोल ९५.४१ रुपये आणि डिझेल ८६.६७ रुपये

मुंबईत पेट्रोल १०९.९८ रुपये आणि डिझेल ९४.१४ रुपये

चेन्नईमध्ये पेट्रोल १०१.४० रुपये आणि डिझेल ९१.४३ रुपये

कोलकात्यात पेट्रोल १०४.६७ रुपये आणि डिझेल ८९.७९ रुपये

पोर्ट ब्लेअरमध्ये पेट्रोल ८२.९६ रुपये आणि डिझेल ७७.१३ रुपये

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe