Savings Account : सध्या प्रत्येकाचे बँकेत किमान एक तरी बचत खाते आहे. तुम्ही बचत खाते UPI शी लिंक करून इंटरनेट बँकिंग सेवांचा देखील लाभ घेऊ शकता. पण बचत खात्यात पैसे ठेवण्यासाठी प्रत्येक बँकेचे काही नियम आहे, त्या अंतर्गत तुम्ही बचत खात्यात तुमचे पैसे ठेवू शकता.
तुम्हाला बचत खात्यावर व्याजही मिळते, ज्यामुळे तुमचे उत्पन्नही वाढते. पण तुम्हाला माहिती आहे का तुम्ही तुमच्या बचत खात्यात जास्तीत जास्त किती रक्कम जमा करू शकता?

बचत खात्यात पैसे जमा करण्यासाठी कमाल मर्यादा नाही. परंतु जर तुम्ही एका मर्यादेपेक्षा जास्त रक्कम जमा केली तर तुम्हाला त्यावर कर भरावा लागतो. चला जाणून घेऊया काय आहेत आयकराचे नियम?
बचत खात्यात किती पैसे जमा करता येतील?
बचत खात्यात तुम्हाला हवे तेवढे पैसे ठेवता येतात. परंतु तुम्ही विशेष काळजी घेतली पाहिजे की तुम्ही त्यात फक्त तेवढीच रक्कम ठेवाल जी ITR च्या कक्षेत येते. जर तुम्ही जास्त रोकड ठेवली तर तुम्हाला मिळणाऱ्या व्याजावर कर भरावा लागेल.
आयटीआर भरताना, तुमच्या बचत खात्यात किती पैसे जमा आहेत आणि त्यावर तुम्हाला किती व्याज मिळते हे तुम्हाला आयकर विभागाला सांगावे लागेल. तुमच्या बचत खात्यातील ठेवींमधून तुम्हाला मिळणारे व्याज तुमच्या उत्पन्नात जोडले जाते.
जर तुमचे वार्षिक उत्पन्न 10 लाख रुपये असेल आणि तुम्हाला त्यावर बँकेकडून 10,000 रुपये व्याज मिळत असेल, तर आयकर नियमांनुसार तुमचे एकूण उत्पन्न 10,10,000 रुपये मानले जाईल.
नियमांनुसार बचत खात्यात पैसे ठेवण्याची मर्यादा नाही. पण जर तुम्ही एका आर्थिक वर्षात तुमच्या खात्यात 10 लाख रुपये किंवा त्याहून अधिक रक्कम जमा करत असाल, तर तुमच्यासाठी आयकर विभागाला याची माहिती देणे महत्त्वाचे आहे. कारण ते आयकराच्या कक्षेत येते. तुम्ही असे न केल्यास आयकर विभाग तुमच्यावर करचुकवेगिरीप्रकरणी कारवाई करू शकते.