इंडिगोच्या शेअर्समध्ये 10% घसरण! गुंतवणूकदारांसाठी धोक्याची घंटा? यामागील कारणे काय?

Published on -

Indigo Share Price:- शुक्रवारी शेअर बाजारात एक महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. देशातील आघाडीची विमान वाहतूक कंपनी इंडिगो चालवणाऱ्या इंटरग्लोब एव्हिएशनच्या शेअर्समध्ये तब्बल ६% घट झाली. ही घसरण एखाद्या छोट्या कारणामुळे नव्हे, तर जागतिक पातळीवरील अस्थिरता आणि इंधन खर्चातील अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर झाली आहे.

मध्य पूर्वेत पुन्हा एकदा इस्रायल आणि इराण यांच्यातील तणाव चिघळला आहे. इस्रायलने केलेल्या हवाई हल्ल्यांमुळे संपूर्ण प्रदेशात युद्धसदृश स्थिती निर्माण झाली असून, याचा थेट परिणाम आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरांवर झाला आहे. अवघ्या काही तासांत या दरात १३ टक्क्यांपेक्षा अधिक वाढ झाली. विमान कंपन्यांसाठी इंधन हा सर्वात मोठा खर्च असतो, त्यामुळेच इंडिगो सारख्या कंपन्यांच्या नफ्यावर आणि त्यामुळेच शेअरच्या किमतीवर तात्काळ परिणाम झाला.

इंटरग्लोब एव्हिएशनच्या शेअर्समध्ये मोठी घसरण

या पार्श्वभूमीवर, इंटरग्लोब एव्हिएशनचा शेअर ५,७३१ रुपयांच्या अलीकडील उच्चांकी पातळीवरून ५,१७५ रुपयांपर्यंत घसरला. ही जवळपास १०% घसरण आहे. बाजार भांडवलही दोन लाख कोटी रुपयांच्या खाली आले. तांत्रिक भाषेत बोलायचं झालं तर, ही घसरण ‘मार्केट सेन्सिटिव्ह’ घटकांमुळे झाली आहे, म्हणजेच कंपनीच्या कारभारात काही दोष नसताना बाह्य कारणांनी दबाव आला आहे.

या सगळ्यात अजून एक महत्त्वाचा मुद्दा ठरला तो म्हणजे अहमदाबादमध्ये घडलेला एअर इंडियाच्या बोईंग विमानाचा अपघात. या अपघातामुळे प्रवाशांमध्ये आणि गुंतवणूकदारांमध्ये एक अस्वस्थता निर्माण झाली आहे. बोईंग ही इंडिगोच्या विमानांचा प्रमुख पुरवठादार आहे. अपघातानंतर बोईंगचे अमेरिकन बाजारातील शेअर्सही ५% नी कोसळले. अशा घटना केवळ प्रवासावरच नाही, तर कंपन्यांच्या ऑर्डर आणि विश्वासार्हतेवरही परिणाम करतात.

इंडिगोच्या शेअरसाठी तज्ञांनी दिलेली टार्गेट प्राईस

तरीही, दीर्घकालीन दृष्टीने इंडिगोबद्दल गुंतवणूकदारांमध्ये आशा कायम आहे. देशांतर्गत मागणीत वाढ असून, कंपनी नवनवीन मार्ग सुरू करत आहे. कोटक इन्स्टिट्यूशनल आणि HSBC ग्लोबल यांसारख्या ब्रोकरेज कंपन्यांनी इंडिगोच्या शेअरसाठी ६,५०० रुपयांपेक्षा अधिकचे लक्ष्य दिले आहे. त्यांनी ‘बाय’ रेटिंगही कायम ठेवले आहे. त्यामुळे अल्पावधीत दबाव असला तरी दीर्घकालीन चित्र अजूनही सकारात्मक असल्याचे संकेत मिळत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News