Infosys Share Price : तुम्हीपण तुमच्या पोर्टफोलिओ मध्ये नवीन शेअर्स ॲड करणार आहात का मग तुमच्यासाठी आजची बातमी कामाची असेल. खरंतर इन्फोसिसने अलीकडेच तिमाही निकाल जाहीर केले आहेत. या निकालात कंपनीच्या नफ्यात घट झाली असल्याचे समोर आले आहे.
साहजिकच नफा घटला म्हणजेच शेअर्स वर दबाव येण्याची शक्यता वाढते. मात्र इन्फोसिस चा नफा घटलेला असतानाही शेअर्सवर दबाव येण्याऐवजी यात तेजी पाहायला मिळाली आहे. गुंतवणूकदार हे शेअर्स मोठ्या प्रमाणात खरेदी करत आहेत.

याच कारणास्तव आज शुक्रवारी कंपनीच्या शेअर्समध्ये 5 टक्क्यांची प्रचंड मोठी तेजी पाहायला मिळाली. यामुळे सर्वसामान्य गुंतवणूकदारांना नफा घटलेला असतानाही तेजी येण्याचे कारण काय असा प्रश्न पडला आहे. आता याबाबत तज्ञांकडूनही स्पष्टीकरण देण्यात आले आहे.
कंपनीचा महसूल वाढीचा अंदाज
इन्फोसिसचा नफा कमी झालाय पण कंपनीचे भविष्य उज्वल आहे. यामुळे 14 जानेवारी रोजी 1608 रुपयांवर क्लोज झालेला हा स्टॉक 5% वाढीसह शुक्रवारी 1682 रुपयांवर पोहोचला आहे.
तज्ञ सांगतात की तिमाही निकाल जाहीर झाल्याबरोबर अमेरिकन मार्केटच्या इन्फोसिस मधील एडीआर मध्ये आठ टक्क्यांची वाढ झाली. डिसेंबर तिमाही मध्ये कंपनीचा एकत्रित निव्वळ नफा जवळपास 2.2% नी घटला.
परंतु ही घट कंपनीच्या चुकीमुळे नाही तर नव्या कायद्यामुळे आलेले आहे. केंद्र शासनाच्या नव्या कायद्यामुळे कंपनीला मोठा खर्च करावा लागला आहे. तसेच आपल्या नव्या अंदाजात महसूल वाढ तीन ते साडेतीन टक्क्यांनी वाढवली आहे.
नव्या करारामुळे गुंतवणूकदारांच्या आशा पल्लवीत
शिवाय डिसेंबर तिमाही मध्ये कंपनीकडून मोठे करार झालेले आहेत. कंपनीने तब्बल 4.8 अब्ज डॉलर चे करार केलेले आहेत. यामुळे एचएसबीसी या ब्रोकरेज हाऊसने या स्टॉक साठी बाय रेटिंग कायम ठेवत 1870 रुपयांची टार्गेट प्राईस सेट केलेली आहे.
CLSA ने सुद्धा 1779 रुपयांची टार्गेट प्राईस सेट करत यासाठी आउट परफॉर्म रेटिंग दिलेली आहे. म्हणजेच येत्या काळात हा स्टॉक गुंतवणूकदारांना चांगला परतावा देणार असे या ब्रोकरेज हाऊस च्या अहवालातून स्पष्ट होताना दिसते.
गुंतवणूकदारांना देखील कंपनीचा भविष्यातील दृष्टिकोन आवडला आहे. यामुळे नफा घटला असला तरी देखील या कंपनीच्या शेअर्समधील खरेदी वाढताना दिसत आहे.













