PM Suraksha Bima Yojana : फक्त 2 रुपयांच्या गुंतवणुकीवर 2 लाख रुपयांपर्यंतचा विमा; सरकारच्या ‘या’ योजनेसाठी असा करा अर्ज…

Published on -

PM Suraksha Bima Yojana : देशाच्या लोकसंख्येमध्ये सातत्याने वाढ होत आहे. अशा परिस्थितीत सरकार गरीब वर्गासाठी अनेक योजना आणत आहे. लोकांना आर्थिक मदत देण्यासाठी सरकारद्वारे एका पेक्षा एक योजना चालवल्या जातात.

लोकांच्या गरजा लक्षात घेत सरकारद्वारे पीएम सुरक्षा विमा योजना देखील सुरु करण्यात आली आहे. ही योजना सुरू करण्यामागचा उद्देश असा होता की, कुटुंबप्रमुखाचा अपघात झाल्यास कुटुंबाला आर्थिक मदत केली जाईल.

सरकारच्या या योजनेत वार्षिक 20 रुपये आणि मासिक 2 रुपये गुंतवावे लागतात. इतक्या कमी गुंतवणुकीत सरकार 2 लाख रुपयांपर्यंतचा जीवन विमा देते. सरकारने ही योजना 2016 मध्ये सुरू केली होती. ही योजना कशी काम करते आणि याचा लाभ कसा मिळवायचा? चला जाणून घेऊया..

योजनेचा लाभ कसा मिळवावा?

18 ते 70 वर्षे वयोगटातील व्यक्ती या सरकारी योजनेचा लाभ घेऊ शकतात. या योजनेत, गुंतवणुकीची रक्कम जोडलेल्या बँक खात्यातून आपोआप वजा केली जाते. या योजनेत पॉलिसीधारकाचा अपघात, मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास 2 लाख रुपयांचा विमा उपलब्ध आहे.

या अपघात विम्याअंतर्गत अपंगत्व आल्यास एक लाख रुपयांची रक्कम सरकारकडून दिली जाते. तर विमाधारकाच्या मृत्यूनंतर, नॉमिनीला विम्याची रक्कम मिळते.

असा करायचा अर्ज?

या सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने अर्ज करता येतील. ऑनलाइन अर्जासाठी तुम्हाला https://www.jansuraksha.gov.in/ ला भेट द्यावी लागेल. येथे तुम्हाला अर्ज भरावा लागेल. फॉर्म सबमिट करण्यापूर्वी, तुम्हाला त्यासोबत कागदपत्रे जोडावी लागतील. ऑफलाइन अर्ज करण्यासाठी, तुम्हाला जवळच्या बँकेच्या शाखेशी संपर्क साधावा लागेल.

आवश्यक कागदपत्रे

महत्त्वाच्या कागदपत्रांबद्दल बोलायचे झाल्यास, त्यासाठी आधार कार्ड, मतदार कार्ड, रेशन कार्ड किंवा कोणताही ओळखपत्र, बँक खात्याचा तपशील, वयाच्या पुराव्यासाठी जन्म प्रमाणपत्र, पासपोर्ट आकाराचा फोटो इत्यादी आवश्यक आहेत.

योजनेबाबतच्या अटी

या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी, अर्जदाराचे सक्रिय बचत खाते असणे आवश्यक आहे. खाते निष्क्रिय झाल्यास पॉलिसी रद्द होईल. ऑटो डेबिटसाठी, अर्जदाराला करार पत्र किंवा स्वाक्षरी देखील आवश्यक आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe