केंद्र सरकारच्या ‘या’ योजनेत 1000 ची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांसाठी लाखोंचा फंड जमवा…वाचा संपूर्ण माहिती

Published on -

Sarkari Yojana: सरकारच्या माध्यमातून समाजातील विविध घटक तसेच महिला आणि लहान मुलांच्या भविष्याच्या आर्थिक दृष्टिकोनातून महत्त्वाच्या अशा अनेक योजना सुरू केलेल्या आहेत. त्यातल्या त्यात लहान मुलांसाठी आतापासून पालकांना गुंतवणूक करता यावी आणि मुलांचे आर्थिक भविष्य समृद्ध करता यावे याकरिता या योजनांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. अशाप्रकारे केंद्र सरकारने मुलांचे आर्थिक भविष्य सुरक्षित करण्याच्या दृष्टिकोनातून एनपीएस वात्सल्य योजना सुरू केलेली असून मुलांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी ही योजना अतिशय महत्त्वाची आहे व यामध्ये पालकांना आपल्या अठरा वर्षाखालील मुलांच्या नावाने खाते उघडून गुंतवणूक करता येते व तुम्हाला हवे तितके पैसे यामध्ये जमा करता येऊ शकतात. या योजनेच्या प्रमुख अट अशी आहे की यामध्ये गुंतवणूकदाराला वर्षाला कमीत कमी 1000 रुपयांची गुंतवणूक करणे बंधनकारक करण्यात आलेले आहे व कमाल रकमेवर कुठलीही मर्यादा नाही. चला तर मग या लेखामध्ये आपण या योजनेविषयीची थोडक्यात माहिती बघू.

एनपीएस वात्सल्य योजनेचे स्वरूप

मुलांच्या भविष्याच्या सुरक्षिततेकरिता केंद्र सरकारने ही योजना सुरू केली व या योजनेत पालक आपल्या अठरा वर्षाखालील मुलांच्या नावाने गुंतवणूक करू शकतात. या योजनेत वर्षाला कमीत कमी एक हजार रुपयांची गुंतवणूक करणे बंधनकारक असून जास्तीत जास्त कितीही रकमेची गुंतवणूक या योजनेत करता येते व यामुळे मुलांच्या समृद्ध आर्थिक भविष्यासाठी चांगली बचत पालकांना करणे सुलभ होते. या योजनेचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे जेव्हा मुल हे अठरा वर्षाचे पूर्ण होते तेव्हा या योजनेतील खाते आपोआप नियमित एनपीएस योजनेमध्ये ट्रान्सफर होते. याचा फायदा असा होतो की मुलं जेव्हा तरुण वयामध्ये असतात तेव्हाच त्यांच्या निवृत्तीचा निधी तयार होतो व त्यावर व्याज मिळते व जास्तीचा फायदा मुलांना मिळत असतो. या योजनेमध्ये टपाल खाते तसेच आई-वडील, बँक, पेन्शन फंड किंवा इ एनपीएस प्लॅटफॉर्म वापरता येतो या माध्यमातून या योजनेत सहभागी होता येऊ शकते. तसेच गंभीर आजार, शिक्षण किंवा 75% पेक्षा मुलाला जास्त अपंगत्व आले तर या योजनेत खाते सुरू केल्यानंतर कमीत कमी तीन वर्षांनी तीन वेळा 25% रक्कम काढता येऊ शकते व ही रक्कम काढण्याची सुविधा जास्तीत जास्त तीन वेळा देण्यात आलेली आहे. मुलासाठी किंवा मुलीसाठी वयाच्या 18 वर्षाचा होईपर्यंत हा लाभ मिळतो. योजनेचा महत्वाचा फायदा म्हणजे मुलांच्या भविष्यातील शिक्षण आणि आरोग्यासाठी लहान वयामध्ये एक मोठी आर्थिक बचत या माध्यमातून तयार होते.

या योजनेच्या अटी व पात्रता

या योजनेत फक्त मुलाच्या नावाने पालकांना खाते उघडता येते व भारतीय नागरिक असलेल्या लहान मुलांसाठी खाते उघडता येणे शक्य आहे. तसेच मुलाचे वय 18 वर्षापेक्षा कमी असावे यामध्ये एक हजार रुपयाचे किमान वार्षिक आधारावर एक हजार रुपयांची रक्कम जमा करावी लागते. खात्यामधून तीन वर्षे पूर्ण झाल्यानंतर काही विशिष्ट परिस्थितीमध्ये प्रत्येकी तीन वेळा 25% ची रक्कम काढता येऊ शकते. तसेच या योजनेत खाते उघडल्यानंतर तीन महिन्यांच्या आत नवीन केवायसी पूर्ण करणे आवश्यक आहे. हे खाते मुलांच्या माध्यमातून आई वडिलांना चालवता येते व आई वडील जर नसतील तर न्यायालयाने नियुक्त केलेल्या संरक्षकाला हा अधिकार देण्यात आलेला आहे. अशा माध्यमातून न्यायालयाने जर संरक्षक नेमलेला असेल तर त्याला न्यायालयाचा आदेश आणि केवायसीची कागदपत्रे सादर करावी लागतात.

या योजनेत सहभागी होण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

या योजनेत सहभागी होण्यासाठी पालकांचे आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट किंवा ड्रायव्हिंग लायसन्स, फोटो आणि स्वाक्षरी तसेच मोबाईल क्रमांक व ईमेल आयडी, मुलांचे जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला, पासपोर्ट आणि बँक तपशील (भारताबाहेर राहणाऱ्या भारतीय पालकांसाठी) आणि भारताशी स्थायी संबंध असलेल्या परदेशी नागरिक पालकांसाठी परदेशी पत्ता,बँक तपशील आणि पासपोर्ट आवश्यक असतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News