Interest Rate On FD : प्रत्येक गुंतवणूकदाराला त्यांची बचत सुरक्षित असावी असे वाटेत, म्हणूनच बहुतेक लोकं आपली बचत एफडी सारख्या योजनांमध्ये करणे पसंत करतात. येथील गुंतवणूक ही सर्वात सुरक्षित गुंतवणूक मानली जाते, तसेच येथे सध्या चांगला परतावा देखील मिळत आहे.
अशातच जर तुम्ही भविष्यासाठी सुरक्षित गुंतवणुक पर्याय शोधत असाल तर आज आम्ही काही बँकांची यादी घेऊन आहोत, जिथे तुम्हाला 9 टक्क्यांहून अधिक व्याजदर दिले जात आहेत.
एफडीवर उत्तम परतावा देणाऱ्या टॉप बँका !
उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक
ही बँक दोन ते तीन वर्षांच्या मुदत ठेवींवर आपल्या गुंतवणूकदारांना 9.10 टक्के व्याजदर देत आहे. हे दर 21 ऑगस्ट 2023 पासून लागू झाले आहेत. जर तुम्हाला जास्त परतावा हवा असेल तर तुम्ही येथे गुंतवणूक करू शकता.
युनिटी स्मॉल फायनान्स बँक
ही बँक 1001 दिवसांच्या मुदत ठेवींवर 9 टक्के व्याजदर देत आहे. हे दर 2 फेब्रुवारी 2024 पासून लागू झाले आहेत.
सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक
ही बँक दोन ते तीन वर्षांच्या मुदत ठेवींवर 9.10 टक्के व्याजदर देत आहे. हे दर 22 डिसेंबर 2023 पासून लागू झाले आहेत.
जन स्मॉल फायनान्स बँक
ही बँक 365 दिवसांच्या मुदत ठेवींवर 9 टक्के व्याजदर देत आहे. हे दर 2 जानेवारी 2024 पासून लागू होतील.
फिनकेअर स्मॉल फायनान्स बँक
ही बँक 750 दिवसांच्या मुदत ठेवींवर 9.21 टक्के व्याजदर देत आहे. हे दर 28 ऑक्टोबर 2023 पासून लागू झाले आहेत.
इक्विटास स्मॉल फायनान्स बँक
ही बँक 444 दिवसांच्या मुदत ठेवींवर 9 टक्के व्याज दर देत आहे आणि तेही ज्येष्ठ नागरिकांना अतिरिक्त 0.50 टक्के ऑफरसह. हे दर 21 ऑगस्ट 2023 पासून लागू झाले आहेत.