Post Office Scheme : तुम्ही सध्या गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल आणि तुम्हाला गुंतवणुकीसाठी योग्य पर्याय सापडत नसेल तर आज आम्ही तुमच्यासाठी एक उत्तम गुंतवणूक योजना घेऊन आलो आहोत. बहुतेक गुंतवणूकदार स्वतःसाठी सुरक्षित गुंतवणूक पर्याय निवडतात कारण त्यात पैसे बुडण्याची भीती नसते. यामुळे बहुतेक गुंतवुवणूकदार पोस्ट ऑफिस योजनांमध्ये गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात.
ज्यांना निश्चित व्याजाखाली हमी उत्पन्न हवे आहे त्यांच्यासाठी पोस्ट ऑफीच्या योजना सर्वोत्तम आहेत. आजच्या लेखाद्वारे आपण पोस्ट ऑफिसच्या काही खास योजनांबद्दल जाणून घेणार आहोत, ज्या खूपच लोकप्रिय आहेत. येथे परतावा देखील चांगला मिळतो.

पोस्ट ऑफिसच्या तीन विशेष योजना आहेत ज्या जबरदस्त हमी परतावा देतात. पोस्ट ऑफिस आवर्ती ठेव, पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट, पोस्ट ऑफिस नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट (NSC). यापैकी, एफडी वगळता, इतर सर्व 5 वर्षांच्या लॉक-इन कालावधीसह येतात. या योजनांमध्ये गुंतवणूक करणे सर्वात सुरक्षित मानले जाते कारण त्या केंद्र सरकारच्या पोस्ट ऑफिसद्वारे ऑफर केल्या जातात. यामध्ये तुम्हाला टॅक्स सेव्हिंग देखील मिळते.
पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट खाते 5 वर्षांसाठी गॅरंटीड परतावा शोधणाऱ्यांसाठी सुरक्षित पर्याय आहे. तुम्ही या योजनेत दरमहा किमान 100 रुपये किंवा 10 रुपयांच्या पटीत कोणतीही रक्कम गुंतवू शकता. येथे 5.8 टक्के व्याज दराने तिमाही व्याज उपलब्ध आहे. यामध्ये जास्तीत जास्त गुंतवणुकीला मर्यादा नाही.
पोस्ट ऑफिस नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट (NSC) योजनेला 5 वर्षांचा लॉक इन आहे. या योजनेत ७ टक्के व्याज मिळते. यामध्ये किमान 1000 रुपयांपसून पुढे गुंतवणूक करता येते. यामध्ये जास्तीत जास्त गुंतवणुकीला मर्यादा नाही. लॉक-इन कालावधीनंतर तुम्ही पैसे काढू शकता. तथापि, काही अटी आहेत ज्या अंतर्गत तुम्ही मुदतपूर्व पैसे काढू शकता. या योजनेत गुंतवणूक केल्यास तुम्हाला 80C अंतर्गत कर सूटही मिळते.