तुमच्या पत्नीसोबत ‘या’ योजनेत करा गुंतवणूक आणि मिळवा वार्षिक 1 लाख 11 हजार रुपये निश्चित उत्पन्न! जाणून घ्या माहिती

Post Office Scheme:- गुंतवणुकीसाठी पोस्ट ऑफिस आणि विविध बँकांच्या योजना अतिशय महत्त्वाच्या असून अनेक गुंतवणूकदार या योजनांच्या माध्यमातून गुंतवणूक करून चांगला परतावा मिळवतात. गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळवण्यासाठी अनेक प्रकारच्या योजनांमध्ये काही नियम देखील आहेत व या नियमांचा जर आधार घेऊन गुंतवणूक केले तर अनेक प्रकारचे फायदे गुंतवणुकीतून मिळतात.

अगदी याच पद्धतीने तुम्हाला देखील गुंतवणूक करून घरी बसून चांगले पैसे मिळवायचे असतील तर पोस्ट ऑफिसची एक योजना तुमच्यासाठी खूप फायद्याची ठरू शकते. पोस्टाची महत्त्वाची असलेली ही योजना म्हणजे पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना होय.

या योजनेत गुंतवणूक करून कोणत्याही व्यक्तीला प्रत्येक महिन्याला निश्चित अशी कमाई करता येऊ शकते. जे लोक सेवानिवृत्त आहेत अशा लोकांसाठी पोस्टाची ही योजना खूप फायदेशीर ठरू शकते.

दुसरे वैशिष्ट्ये जर बघितले तर या योजनेमध्ये तुम्ही पत्नीसोबत संयुक्त खाते उघडून गुंतवणूक सुरू केली तर वर्षाला एक लाख 11 हजार रुपयांपर्यंत कमाई करता येणे शक्य आहे.

कसे आहे पोस्टाच्या एमआयएस अर्थात मासिक उत्पन्न योजनेचे स्वरूप?
पोस्ट ऑफिस एमआयएस अर्थात मासिक उत्पन्न योजना ही एक ठेव योजना आहे या माध्यमातून तुम्ही दर महिन्याला व्याज मिळवता. या माध्यमातून तुम्ही किती व्याज मिळवतात हे तुम्ही किती रक्कम ठेवली आहे यावर अवलंबून आहे. तुमच्या या योजनेतील खात्यावर मिळणारे व्याज पोस्ट ऑफिस बचत खात्यात भरले जाते.

पाच वर्षानंतर तुम्ही या योजनेत जमा केलेली रक्कम काढू शकतात. त्यापुढे जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही ही योजना मॅच्युअर अर्थात परिपक्व झाल्यानंतर नवीन खाते उघडू शकतात. या योजनेमध्ये एकट्या व्यक्तीला म्हणजेच एकल आणि दोन किंवा तीन व्यक्ती मिळून असे संयुक्त खाते देखील उघडू शकतात.

एका व्यक्तीने जर खाते उघडले असेल तर ठेव मर्यादा कमी असते व जॉइंट अकाउंट मध्ये ठेव मर्यादा जास्त आहे. अशा परिस्थितीमध्ये जर तुम्ही तुमच्या पत्नीसोबत जॉईन्ट अकाउंट उघडले तर तुम्ही जास्त पैसे जमा करू शकता व त्या माध्यमातून जास्त व्याज मिळवून जास्तीची कमाई करू शकतात.

किती आहे या योजनेत असलेली एकल आणि जॉइंट अकाउंटमध्ये ठेव मर्यादा?
तुम्ही जर या योजनेत एकल म्हणजे सिंगल अकाउंट ओपन केले असेल तर तुम्ही नऊ लाख रुपये जमा करू शकतात आणि जॉईंट अकाऊंट असेल तर पंधरा लाख रुपये जमा करू शकतात.

विशेष म्हणजे तुम्हाला ही रक्कम एकदाच डिपॉझिट करावी लागते आणि त्यावर तुम्ही पाच वर्षांकरिता व्याज मिळवू शकतात. सध्या पोस्टाच्या या योजनेमध्ये 7.4% दराने व्याज दिले जात आहे.

कसे मिळतील वार्षिक एक लाख 11 हजार रुपये?
समजा तुम्ही जर तुमच्या पत्नीसोबत या योजनेत जॉईंट अकाउंट उघडले व त्यात 15 लाख रुपये जमा केले तर तुम्हाला 7.4% व्याजाने वार्षिक एक लाख 11 हजार रुपये मिळतील आणि प्रत्येक महिन्याला जर ही रक्कम बघितली तर ती साधारणपणे तुम्हाला 9 हजार दोनशे पन्नास रुपये मिळेल.

वर्षाला एक लाख 11 हजार याप्रमाणे जर तुम्ही पाच वर्षाची तुमची कमाई बघितली तर ती पाच लाख 55 हजार रुपये होते. म्हणजे तुम्ही पाच वर्षात पंधरा लाख जमा करून त्यावर पाच लाख 55 हजार रुपये व्याज मिळवू शकतात.

सिंगल अकाउंटमध्ये किती पैसा कमावता येऊ शकतो?
समजा तुम्ही पोस्टाच्या या योजनेत एकट्याने म्हणजे सिंगल अकाउंट उघडले तर तुम्ही त्यामध्ये नऊ लाख रुपये जास्तीत जास्त जमा करू शकतात. यावर देखील तुम्हाला वार्षिक 7.4 टक्के दराने व्याज मिळते.

अशाप्रकारे तुम्ही नऊ लाख रुपये जमा केल्यानंतर वर्षाला 66 हजार 600 रुपये व्याजापोटी कमवू शकतात व अशा प्रकारे पाच वर्षात तुम्ही नऊ लाखावर तीन लाख 33 हजार रुपये नुसते व्याज मिळवू शकतात.

कुणाला उघडता येते या योजनेत खाते?
पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेमध्ये कोणत्याही नागरिकाला खाते उघडणे शक्य आहे. मुलाच्या नावाने देखील या योजनेत खाते उघडता येते. तुम्हाला जर मुलाच्या नावाने खाते उघडायचे आहे व त्याचे वय जर दहा वर्षापेक्षा कमी असेल तर त्याचे पालक किंवा कायदेशीर पालक त्याच्या नावावर खाते उघडू शकतात.

जेव्हा मूल दहा वर्षाचे होईल तेव्हा त्याला स्वतः खाते चालवण्याचा मात्र अधिकार मिळू शकतो. तसेच या योजनेच्या खात्यासाठी तुमचे पोस्ट ऑफिसमध्ये सेविंग अकाउंट म्हणजेच बचत खाते असणे गरजेचे आहे.