Post Office Scheme : प्रत्येकाला आपले भविष्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित करायचे आहे. अनेकांना आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी, त्यांच्या लग्नासाठी मोठा निधी उभा करायचा आहे. संसाराच्या गरजा पूर्ण करण्यासाठी, घर घेण्यासाठी, गाडी घेण्यासाठी मोठा पैसा उभा करायचा आहे. यामुळे गुंतवणुकी शिवाय पर्याय राहिलेला नाही. अनेकांनी वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवणूक सुरु पण केली आहे. दरम्यान आज आपण सुरक्षित गुंतवणुकीच्या एका भन्नाट योजनेची माहिती सांगणार आहोत. खरे तर शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंडच्या काळात आजही असे काही लोक आहेत जे की सुरक्षित गुंतवणुकीला महत्त्व दाखवतात. दरम्यान जर तुम्हीही सुरक्षित गुंतवणुकीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी पोस्ट ऑफिसची मंथली इनकम स्कीम फायद्याची ठरणार आहे.
तज्ञ सांगतात की जर तुम्ही योग्य अभ्यास करून आणि योग्य ठिकाणी गुंतवणूक केली तर तुम्हाला लॉन्ग टर्म मध्ये चांगला फायदा मिळतो. पोस्ट ऑफिसच्या बचत योजनांमधूनही गुंतवणूकदारांना चांगला फायदा मिळतोय. देशातील सर्वसामान्य नागरिकांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या गरजा डोळ्यापुढे ठेवून पोस्ट ऑफिसने आत्तापर्यंत असंख्य बचत योजना सुरू केल्या आहेत. टाईम डिपॉझिट योजना, किसान विकास पत्र, आरडी, पीपीपी तसेच मासिक उत्पन्न योजना या पोस्टाच्या काही लोकप्रिय योजना आहेत. आज आपण यातीलच मासिक उत्पन्न योजनेबाबत डिटेल माहिती जाणून घेऊयात.

कशी आहे एमआयएस योजना?
पोस्टाच्या मंथली इन्कम स्कीम मध्ये गुंतवणूकदारांना एकरकमी गुंतवणूक करावी लागते. या गुंतवणुकीवर मग पोस्टाकडून निश्चित व्याजदराने दरमहा व्याज दिले जाते. या योजनेत गुंतवणूकदारांना जॉईंट आणि सिंगल अकाउंट ओपन करता येते. जॉईंट अकाउंट ओपन केल्यास जास्तीत जास्त 15 लाख रुपयांची गुंतवणूक करता येते. सिंगल अकाउंट ओपन केल्यास जास्तीत जास्त नऊ लाख रुपये गुंतवता येतात. यामध्ये कमीत कमी 1000 रुपयांची गुंतवणूक करावी लागते. गुंतवणुकीवर पोस्टाकडून 7.4% व्याज दिले जाते.
मंथली इनकम स्कीम चे अकाउंट ओपन करण्यासाठी तुमच्याकडे पोस्टाचे बचत खाते असणे आवश्यक आहे. या योजनेचे जॉईंट अकाउंट ओपन करायचे असल्यास तुम्ही दोन किंवा तीन व्यक्ती मिळून अकाउंट ओपन करू शकता. जर तुम्ही पोस्टाच्या एमआयएस योजनेचे सिंगल अकाउंट ओपन केले आणि यात नऊ लाख रुपयांची इन्वेस्टमेंट केली तर तुम्हाला वार्षिक 7.4% व्याजदराने दरमहा 5,550 रुपयांचे व्याज मिळणार आहे. या योजनेचे व्याज हे प्रत्येक महिन्याला गुंतवणूकदाराच्या बचत खात्यात वर्ग केले जाते. ही योजना पाच वर्षात परिपक्व होते. योजना मॅच्युअर झाल्यानंतर तुमचे गुंतवणुकीचे पैसे थेट तुमच्या बचत खात्यात जमा केले जातात.