फक्त 100 रुपयात सुरू करा चांदीत Investment आणि लाखो कमवा! जाणून घ्या गुंतवणुकीचा सोपा मार्ग

चांदीमध्ये गुंतवणूक करण्याची संधी वाढत असून सिल्व्हर ईटीएफ हा त्यासाठी एक उत्तम पर्याय ठरत आहे. या वर्षी आतापर्यंत चांदीच्या किमतीत लक्षणीय वाढ झाली आहे. इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशननुसार, या वर्षी एका किलो चांदीची किंमत 9374 रुपयांनी वाढून 95391 रुपये झाली आहे.

Published on -

Investment In Silver:- चांदीमध्ये गुंतवणूक करण्याची संधी वाढत असून सिल्व्हर ईटीएफ हा त्यासाठी एक उत्तम पर्याय ठरत आहे. या वर्षी आतापर्यंत चांदीच्या किमतीत लक्षणीय वाढ झाली आहे. इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशननुसार, या वर्षी एका किलो चांदीची किंमत 9374 रुपयांनी वाढून 95391 रुपये झाली आहे.

तज्ज्ञांच्या मते, भविष्यात चांदीच्या किमतींमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत चांदीमध्ये गुंतवणूक करणे फायदेशीर ठरू शकते. परंतु पारंपरिक पद्धतीने चांदी खरेदी करण्याऐवजी,l सिल्व्हर ईटीएफद्वारे गुंतवणूक करणे अधिक सोयीस्कर आणि सुरक्षित आहे.

सिल्व्हर ईटीएफ म्हणजे काय?

चांदीच्या किंमतीशी निगडित असलेला एक्सचेंज-ट्रेडेड फंड (ETF) आहे. जो स्टॉक एक्सचेंजवर शेअर्सप्रमाणे खरेदी-विक्री करता येतो. याचा मुख्य फायदा म्हणजे तुम्हाला प्रत्यक्ष चांदी खरेदी करण्याची गरज नाही.त्यामुळे भौतिक स्वरूपात चांदी साठवण्याचा खर्च व चोरीचा धोका टाळता येतो.

सिल्व्हर ईटीएफचा बेंचमार्क हा स्पॉट सिल्व्हर किमतींवर आधारित असतो.त्यामुळे त्याची किंमत प्रत्यक्ष चांदीच्या बाजारभावाच्या जवळपास असते. गेल्या एका वर्षात सिल्व्हर ईटीएफने 35% पर्यंत परतावा दिला आहे.त्यामुळे तो गुंतवणूकदारांसाठी आकर्षक ठरत आहे.

सिल्वर ईटीएफ मधील गुंतवणुकीचे फायदे

या गुंतवणुकीचे अनेक फायदे आहेत. सिल्व्हर ईटीएफच्या माध्यमातून कमी रकमेत चांदी खरेदी करता येते. पारंपरिक पद्धतीने चांदी खरेदी करण्यासाठी मोठी रक्कम एकत्र करावी लागते.पण सिल्व्हर ईटीएफमध्ये तुम्ही युनिट्सच्या स्वरूपात गुंतवणूक करू शकता. सध्या एका युनिटची किंमत 100 रुपयांपेक्षा कमी आहे.

त्यामुळे SIP (Systematic Investment Plan) च्या माध्यमातूनही गुंतवणूक करता येते. तसेच सिल्व्हर ईटीएफच्या स्वरूपात खरेदी केलेली चांदी डिमॅट खात्यात सुरक्षित राहते आणि त्यावर फक्त वार्षिक डिमॅट शुल्क भरावे लागते. भौतिक चांदीच्या तुलनेत येथे चोरीचा धोका नाही आणि त्याच्या सुरक्षिततेसाठी अतिरिक्त खर्च करण्याचीही गरज नाही.

याशिवाय सिल्व्हर ईटीएफमध्ये गुंतवणूक करणे आणि त्याचे व्यवस्थापन करणेही खूप सोपे आहे. स्टॉक मार्केटमध्ये शेअर्स खरेदी-विक्री जशी सहज करता येते, तसेच सिल्व्हर ईटीएफही NSE (National Stock Exchange) किंवा BSE (Bombay Stock Exchange) वर सहजपणे खरेदी-विक्री करता येतो. जर तुम्हाला तातडीने पैशांची गरज असेल तर तुम्ही ते मार्केटमध्ये विकू शकता आणि त्वरित पैसे मिळवू शकता.

सिल्वर ईटीएफमध्ये गुंतवणुकीसाठी काय करावे लागेल?

सिल्व्हर ईटीएफमध्ये गुंतवणूक करण्यासाठी डीमॅट खाते असणे आवश्यक आहे. तुम्ही ग्रो, अपस्टॉक्स, पेटीएम मनी यांसारख्या प्लॅटफॉर्मवर मोफत डीमॅट खाते उघडू शकता.

त्यानंतर तुम्ही NSE किंवा BSE वर उपलब्ध असलेल्या विविध सिल्व्हर ईटीएफमधून तुमच्या गरजेनुसार योग्य पर्याय निवडू शकता. गुंतवणूक करताना तुम्ही त्याच्या बेंचमार्क, खर्च गुणोत्तर आणि परताव्याचा विचार करून योग्य निर्णय घेऊ शकता.

एकंदरीत पाहता चांदीच्या किमतीत सातत्याने वाढ होत असल्यामुळे आणि भविष्यातील संभाव्य किंमत वाढीमुळे सिल्व्हर ईटीएफ हा एक आकर्षक गुंतवणूक पर्याय ठरत आहे. हा पर्याय गुंतवणूकदारांसाठी सुरक्षित आणि सोयीस्कर असून त्याचा परतावाही चांगला आहे.

कमी गुंतवणुकीत चांदी खरेदी करण्याची सुविधा, सुरक्षित साठवण आणि त्वरित खरेदी-विक्रीच्या सोयीमुळे सिल्व्हर ईटीएफ हा पारंपरिक चांदीच्या खरेदीपेक्षा अधिक फायदेशीर पर्याय ठरतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe