Investment Scheme: तुम्हाला जर आयुष्यामध्ये पैसे कमवून त्या पैशांच्या गुंतवणुकीतून चांगला फंड म्हणजेच निधी गोळा करायचा असेल तर त्याकरिता तुम्हाला गुंतवणुकीमध्ये सातत्य ठेवणे अतिशय गरजेचे आहे व दीर्घकालीन गुंतवणूक करणे महत्त्वाचे आहे. संयम ठेवून तुम्ही जर दीर्घ कालावधीसाठी गुंतवणूक करत राहिलात व उत्तम असा परतावा देणारा गुंतवणूक पर्याय निवडला असेल तर तुम्हाला निश्चितच काही कालावधीनंतर कोट्यावधी रुपयांचा फंड जमा करता येऊ शकतो. याकरिता तुम्हाला गुंतवणुकीत सातत्य ठेवणे आवश्यक आहेच परंतु चांगला गुंतवणूक पर्याय निवडणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. चला तर मग या लेखात आपण असाच एक गुंतवणूक पर्याय बघणार आहोत जो तुमचे करोडपती होण्याचे स्वप्न पूर्ण करू शकतो.
पब्लिक प्रॉव्हिडंट फंड योजना ठरेल महत्वाची
पब्लिक प्रॉव्हिडंट फंड अर्थात सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी किंवा पीपीएफ ही पोस्ट ऑफिसची अतिशय महत्त्वाची आणि लोकप्रिय अशी योजना असून पंधरा वर्षे कालावधीची ही योजना आहे. या योजनेमध्ये उत्तम नियोजन ठेवून जर तुम्ही गुंतवणूक करायला सुरुवात केली तर तुम्हाला काही कालावधीनंतर खूप चांगल्या प्रकारचा परतावा यामध्ये मिळू शकतो. या योजनेत गुंतवणूक करताना तुम्ही काही धोरण आखणे अतिशय गरजेचे आहे व त्याचे जर तंतोतंत पालन तुम्ही केले तर तुम्हाला करोडपती होण्यापासून कोणीच थांबवू शकत नाही. या योजनेचा कालावधी जरी पंधरा वर्षाचा असला तरी तुम्हाला ती प्रत्येकी पाच वर्षाकरिता अशी दोनदा वाढवता येऊ शकते. सध्या या योजनेच्या माध्यमातून केलेल्या गुंतवणुकीवर 7.1% व्याज दराने परतावा देण्यात येत आहे सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे चक्रवाढ व्याजाचा फायदा देखील यामध्ये मिळतो.

पीपीएफ योजनेतून करोडपती होण्याचा फंडा काय?
पब्लिक प्रॉव्हिडंट फंड अर्थात पीपीएफ योजनेमध्ये तुम्ही पंधरा वर्षांपर्यंत गुंतवणूक करू शकतात. म्हणजेच या योजनेचा परिपक्वता कालावधी हा पंधरा वर्षाचा आहे. परंतु जसे आपण बघितले की या योजनेमध्ये आपल्याला प्रत्येकी दोनदा 5-5 वर्ष याप्रमाणे कालावधी वाढवता येतो. समजा तुम्ही संपूर्ण 25 वर्षाकरिता प्रत्येक वर्षाला 1 लाख 50 हजार रुपयांची गुंतवणूक या योजनेमध्ये केली तर तुमचे 25 वर्षात 37 लाख 50 हजार रुपये यामध्ये जमा होतात. 25 व्या वर्षी जेव्हा ही योजना मॅच्युअर म्हणजेच परिपक्व होते तेव्हा व्याज आणि मुद्दल मिळून 1 कोटी 3 लाख रुपयांचा निधी गुंतवणूकदाराला मिळतो. म्हणजेच गुंतवणुकीपेक्षा तब्बल 65.58 लाख रुपयांचा नफा या माध्यमातून मिळतो. हा एवढा नफा मिळण्यामागे सगळ्यात मोठे कारण म्हणजे मिळणारा चक्रवाढीचा फायदा होय. अशाप्रकारे तुम्ही जर सातत्याने गुंतवणूक करत गेलात तर तुम्ही तुमचे करोडपती होण्याचे स्वप्न या माध्यमातून पूर्ण करू शकता.