Investment Schemes : नशीब बदलणारी योजना! येथे मिळेल सर्वात सर्वाधिक परतावा; अशी करा गुंतवणूक

Ahmednagarlive24 office
Published:
Investment Schemes

Investment Schemes : अनेकजण आपल्या चांगल्या भविष्यासाठी वेगवेगळ्या योजनांमध्ये गुंतवणूक करत असतात. यातील काही योजना चांगल्या परतावा देतात तर काही योजना कमी परतावा देतात. त्यामुळे गुंतवणूक करण्यापूर्वी त्या योजनेची संपूर्ण माहिती जाणून घ्या.

त्यानंतर गुंतवणूक करा. नाहीतर तुम्हाला आर्थिक फटका बसू शकतो. देशातील सर्वात मोठ्या बँकेत म्हणजेच SBI च्या एका योजनेत जर तुम्ही गुंतवणूक केली तर तुम्हाला गुंतवणुकीवर सर्वात जास्त व्याज मिळेल. हे लक्षात ठेवा की ज्येष्ठ नागरिकांसाठी ही योजना आहे.

मिळेल जास्त व्याज

खरंतर कोरोना काळात ज्येष्ठ नागरिकांना त्यांचे पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी जास्तीत जास्त परतावा देण्यासाठी SBI ने WeCare स्पेशल FD योजना सुरु केली होती. या FD योजनेची लोकांना सर्वात जास्त व्याज देणारी FD योजना म्हणून ओळख आहे. या FD योजनेत कमीत कमी गुंतवणूक करून, तुम्हाला आता 5 वर्षे आणि 10 वर्षांत जास्त परतावा मिळवता येईल.

SBI WeCare FD वर 50bps चा अतिरिक्त फायदा मिळत आहे. सध्या SBI च्या या FD योजनेतून 7.50 टक्के दराने व्याज दिले जात आहे. परंतु जर तुम्ही या योजनेत गुंतवणूक करण्याचा विचार करत असल्यास तर तुम्हाला ३० सप्टेंबरपर्यंत त्यात गुंतवणूक करावी लागणार आहे.

सर्वोत्तम गुंतवणूक योजना

वृद्ध नागरिक आता एफडी स्कीम अमृत कलश योजनेचा लाभ घेऊ शकतात. तुम्ही 400 दिवसांसाठी या योजनेत गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर यामध्ये वृद्धांना 7.60 टक्के वार्षिक व्याज देण्यात येत आहे. इतर एफडी योजनेवर 7.10 टक्के व्याज देण्यात येत आहे.

पोस्ट ऑफिस योजना

तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्ट ऑफिस योजना हा सर्वात उत्तम पर्याय आहे. यामध्ये 8.2 टक्के दराने वार्षिक व्याज देण्यात येत आहे. यामध्ये, समजा एखाद्या व्यक्तीचे वय 60 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त असल्यास तर तो पोस्ट ऑफिसमध्ये हे खाते चालू करून त्याचा लाभ घेऊ शकतो. इतकेच नाही तर 55 वर्षांपेक्षा जास्त परंतु 60 वर्षांपेक्षा कमी वयाची VRS घेणारी व्यक्ती देखील हे खाते चालू करू शकते. या योजनेत तुम्हाला 5 वर्षांसाठी गुंतवणूक करावी लागणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe