Investment Schemes : कोणतीही रिस्क न घेता या 2 सरकारी योजनांमध्ये करा गुंतणूक, मिळतील दुप्पट पैसे

Ahmednagarlive24 office
Published:
Investment Schemes

Investment Schemes : आजकाल अनेकजण गुंतवणूक करण्याचे पर्याय शोधात असतात. काहीजण सरकारी योजनांमध्ये गुंतवणूक करत असतात तर काहीजण खाजगी योजनांमध्ये गुंतवणूक करत असतात. तसेच अनेकजण शेअर मार्केटमध्ये देखील गुंतवणूक करत आहेत.

शेअर मार्केटमध्ये सध्या अस्थिरता निर्माण झाली असल्याने बाजार झपाट्याने पडत आहे. त्यामुळे अनेकांना मोठा तोटा सहन करावा लागत आहे. तुम्हालाही कोणतीही रिस्क न घेता पैसे गुंतवणूक करून बंपर नफा मिळवायचा असेल तर सरकारी योजनांचा उत्तम पर्याय उपलब्ध आहे.

तुम्हालाही अनेकदा गुंतवणूक करावी वाटली असेल मात्र पैसे गमवायच्या भीतीने तुम्ही गुंतवणूक केली नसेल. पण सरकारी योजनांमध्ये पैसे गुंतवणूक करण्यावर कसल्याही प्रकराची जोखीम नाही. तुम्ही सरकारच्या किसान विकास पत्र आणि सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) या दोन योजनांमध्ये बिनधास्त गुंतवणूक करू शकता.

किसान विकास पत्र (KVP)

तुम्हालाही कोणतीही रिस्क न घेता गुंतवणूक करायची असेल तर तुमच्यासाठी पोस्ट ऑफिसची किसान विकास पत्र योजना उत्तम पर्याय आहे. या योजनेमध्ये तुम्ही पैसे दुप्पट करू शकता. गुंतवणूकदारांना या योजनेत 7.5 टक्के व्याज दिले जात आहे.

या योजनेत तुम्ही 1000 पासून गुंतवणूक सुरू करू शकता. पैसे दुप्पट होण्यासाठी 9 वर्षे आणि 1 महिन्याचा कालावधी लागतो. 1 लाख रुपये 115 महिन्यांसाठी गुंतवणूक केले तर तर तुम्हाला मुदतीनंतर 2 लाख रुपये मिळतील.

सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF)

गुंतवणूक करण्यासाठी सरकार योजना शोधत असाल तर सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) ही देखील तुमच्यासाठी उत्तम पर्याय आहे. या योजनेचा कालावधी 15 वर्षांपर्यंत आहे. तसेच तुम्ही आणखी पाच वर्षे याचा कालावधी वाढवू शकता.

वार्षिक 1.5 लाख रुपयांपर्यंत PPF योजनेत गुंतवणूक करता येऊ शकते. या योजनेत गुंतवणुकीवर 7.1 व्याज दिले जात आहे. तुम्ही या योजनेत वार्षिक 10,000 रुपये गुंतवणूक केली तर 15 वर्षात 1,15,000 रुपये जमा होतील. यावर तुम्हाला 1,21,214 रुपये व्याज दिले जाईल. तुम्हाला योजनेचा कालावधी संपल्यानंतर 2.71 लाख रुपये दिले जातील.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe